Vidhan Sabha 2019 : अमित शहांना पंकजा मुंडे दाखवणार सावरगांवात ताकद

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 October 2019

शाह यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जमवत मुंडे या शक्तीप्रदर्शन करण्याची शक्‍यता आहे.

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सावरगाव येथे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होत आहे. भगवान बाबा यांच्या जन्मगावी होत असलेल्या या मेळाव्यास यावर्षी विशेष महत्त्व आले आहे. निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या या मेळाव्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. परिणामी, शाह यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जमवत मुंडे या शक्तीप्रदर्शन करण्याची शक्‍यता आहे.

Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटील अडकणार मतदारसंघात, कारण...

विधानसभा निवडणूक अगदी काही दिवसावर आली असताना भगवान भक्तिगड, सावरगाव घाट (पाटोदा) येथे हा दसरामेळावा दरवर्षीप्रमाणे होत आहे. या मेळाव्यास लाखोंच्या संख्येने जनसमुदाय येत असतो. यावर्षी निवडणुका असल्याने या मेळाव्यास अमित शाह देखील उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे या मेळाव्यास जास्त महत्त्व आले असल्याने पंकजा मुंडेही मेळाव्या निमित्त अमित शाह यांच्यासमोर शक्ती प्रदर्शन करण्याची शक्‍यता आहे. हा मेळावा येत्या 8 ऑक्‍टोबर रोजी सकाळी 11 वाजता होत आहे. यासंदर्भात पंकजा मुंडे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन माहिती दिली आहे.

चंद्रकांत पाटलांची गाडी अडवण्याचा प्रयत्न; कार्यकर्ते आक्रमक

दरम्यान, भगवानबाबा यांनी दसऱ्याच्या दिवशी भगवानगडावर (पाथर्डी) सुरू केलेल्या दसरा मेळाव्यास स्व. गोपीनाथ मुंडे प्रत्येक वेळी उपस्थित राहत होते. त्यांच्या पश्‍चात त्यांची कन्या या मेळाव्यास उपस्थित राहून होती. मात्र, मागील काही वर्षापासून हा दसरा मेळावा भगवानबाबा यांच्या जन्मगावी म्हणजे सावरगाव घाट (पाटोदा) येथे घेण्यास सुरवात केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankaja Munde rally at Savargaon in presence of Amit Shah