

परळी वैजनाथ (जि. बीड): पर्यावरण व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी परळी वैजनाथ तालुक्यातील एका कार्यक्रमात आपल्या राजकीय प्रवासाबाबतचे भावनिक विधान केले. ‘‘गेल्या २४ वर्षांपासून एकाच संघर्षामुळे आता कंटाळा आला असून, कधी कधी राजकारणातून निवृत्त व्हावंसं वाटतं’’, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.