पंकजा मुंडेंच्या यशस्वी मध्यस्थीनंतर शेतकऱ्यांचे उपोषण मागे, प्रशासनाला दिल्या कारवाईच्या सूचना

प्रवीण फुटके
Wednesday, 27 January 2021

हिवरा ते पारगाव या गट क्रमांक १७ मधील रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढावे या मागणीसाठी तेथील शेतकऱ्यांनी परळी वैजनाथ येथील तहसील कार्यालयासमोर दोन दिवसांपासून उपोषण सुरू केले होते.

परळी वैजनाथ (जि.बीड) : भारतीय जनता पक्षाच्या माजी मंत्री तथा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर हिवरा येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण बुधवारी (ता.२७) मागे घेतले आहे. तालुक्यातील हिवरा ते पारगाव या गट क्रमांक १७ मधील रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढावे या मागणीसाठी तेथील शेतकऱ्यांनी परळी वैजनाथ येथील तहसील कार्यालयासमोर दोन दिवसांपासून उपोषण सुरू केले होते.

औरंगाबादच्या बेगम यांची तब्बल १८ वर्षानंतर पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका; नातेवाईकांनी मानले पोलिसांचे आभार

पंकजा मुंडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समस्या ऐकून घेतली आणि महसूलच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणात अतिक्रमण करणाऱ्याविरुध्द तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे व नायब तहसीलदार बाबूराव रूपनर यांच्या आश्वासनानंतर आणि पंकजा मुंडे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर शेतकऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा

यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, भारतीय जनचा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नीळकंठ चाटे, हिवरा येथील भाजप नेते वृक्षराज निर्मळ, बंडू निर्मळ, उपोषणकर्ते शेतकरी रघवीर रासवे, ज्ञानेश्वर म्हेत्रे, सुदाम रासवे, भगवान रासवे, तात्यासाहेब घोडके आदी यावेळी उपस्थित होते.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankaja Munde Successful Intervention, Farmers Call Off Strike Beed News