esakal | ...आणि पंकजा मुंडे यांनी हाती घेतला पोलिसाचा दंडूका
sakal

बोलून बातमी शोधा

Beed News

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त गोपीनाथगडावर मोठी गर्दी झाली. दरम्यान नेत्यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर व्यासपीठावरही गर्दी झाली

...आणि पंकजा मुंडे यांनी हाती घेतला पोलिसाचा दंडूका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : बेधडक बोलण्यात आणि वागण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या पंकजा मुंडेंनी भावनिक कार्यक्रमातही आपला वागण्यातला बेधडकपणा दाखवून दिला. व्यासपीठावरील गर्दी हटविण्यासाठी त्यांनी थेट पोलिसाच्या हातातला दंडूका त्यांनी हाती घेतला आणि गर्दी हटविली. 

परळीजवळील पांगरी येथील गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती होत आहे. जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी उघड जाहीर केलेली नाराजी, पंकजा मुंडेंचे मौन आणि समर्थकांनी सोशल मिडीयावर व्हायरल केलेल्या विविध पोस्टमुळे पंकजा मुंडे काही वेगळी भूमिका घेतील असे आडाखे बांधले जात होते. मात्र, खुद्द पंकजा मुंडेंनी याचे खंडन केले. परंतु, जी भूमिका आणि भावना असेल ती कार्यक्रमातच जाहीर करु असे सांगत सस्पेन्सही निर्माण केला होता.

खडसेंनी खडसावले, अपयशाची जबाबदारी घ्या

दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर भाजपनेही एक खबरदारीचा उपाय म्हणून चंद्रकांत पाटलांना गोपीनाथगडावर पाठविले. त्यानंतर पंकजा मुंडे व चंद्रकांत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चेमुळे नियोजित कार्यक्रमाला अडीच तासांचा उशिर झाला. त्यानंतर सर्व नेते व्यासपीठावर आल्यानंतर व्यासपीठावर मोठी गर्दी झाली. यावेळी पाहुण्यांना वाट काढून देण्यासाठी पंकजा मुंडे यांनी एका पोलिसाच्या हातातील दंडूका हाती घेत उगाराला सुरुवात केला आणि वाट मोकळी झाली.

पित्याने केला अत्याचार, न्यायासाठी तिने गाठले आझाद मैदान

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री एकाथराव खडसे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मंत्री, बबनराव लोणीकर, प्रकाश मेहता, अतुल सावे आदींसह खासदार प्रितम मुंडे, आमदार सुरेश धस, सुरजितसिंह ठाकूर, नमिता मुंदडा, मोनिका राजळे, मेघना बोर्डीकर, रमेश आडसकर नेतेही उपस्थित आहेत.

loading image