गुंड पाळू नका, दोन घास कमी खा पण स्वाभिमानाने रहा; खोटं काम....; पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

Pankaja Munde : बीडमध्ये भगवानगडावर झालेल्या दसरा मेळाव्यात मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमधील गुन्हेगारी घटनांवर अप्रत्यक्ष भाष्य केलं. दोन घास कमी खा पण स्वाभिमानाने रहा असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.
Pankaja Munde Urges People to Avoid Crime Live With Self Respect Even With Less Food

Pankaja Munde Urges People to Avoid Crime Live With Self Respect Even With Less Food

Esakal

Updated on

बीडमध्ये सावरगाव इथं भगवानगडावर मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. धनंजय मुंडे यांच्यानंतर मंत्री पंकजा मुंडे यांचं भाषण झालं. भाषणात पंकजा मुंडे यांनी वारशात मला संघर्ष मिळालाय आणि त्यासोबत लढण्याची जिद्दही मिळाल्याचं सांगितलं. राज्यात अतिवृष्टी, महापूर यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. अशा स्थितीतही तुम्ही माझ्यावरील प्रेमापोटी इथं आलात याबद्दल आभार. पुरामुळे ओढावलेल्या संकटामुळे जातीपातीचं जोखड गळून पडलं आणि माणूस माणसाच्या मदतीला धावून आल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com