esakal | पंकजा मुंडेंचा दावा तगडा; परळीकरांना तिसऱ्या आमदाराची आशा
sakal

बोलून बातमी शोधा

Beed News

सध्या परळीतून धनंजय मुंडे आमदार आहेत. तर, मधल्या काळात राष्ट्रवादीने त्यांच्या कोट्यातून संजय दौंड यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. आता पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर आमदारकी मिळाली, तर परळीला तीन आमदार होतील.

पंकजा मुंडेंचा दावा तगडा; परळीकरांना तिसऱ्या आमदाराची आशा

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणुका होत आहेत. भाजपला चार जागा शक्य आहेत. यात माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा भाजपकडून दावा प्रबळ मानला जात आहे. त्यामुळे परळीकरांनाही तिसऱ्या आमदाराची अपेक्षा लागली आहे.

सध्या परळीतून धनंजय मुंडे आमदार आहेत. तर, मधल्या काळात राष्ट्रवादीने त्यांच्या कोट्यातून संजय दौंड यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. आता पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर आमदारकी मिळाली, तर परळीला तीन आमदार होतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार होणे आवश्यक झाले होते. त्यांच्या विधान परिषदेच्या नियुक्तीवरुन गदारोळ माजला होता. अखेर विधान परिषदेच्या नऊ जागांची निवडणुक घेऊन ठाकरेंचा मार्ग सुकर करण्याचा फॉर्म्युला समोर आला आहे. या फॉर्म्युल्यानुसार भाजपला चार जागा मिळतील, असे संख्याबळ आहे. 

परभणीतून फोन आला आणि औरंगाबादेत घडले काय...  

वास्तविक चार जागांच्या विजयासाठी भाजपला काही मते कमी पडत असली, तरी सध्याची राज्याची स्थिती पाहता यावर एकमत होईल असे मानले जाते. दरम्यान, भाजपच्या चार जागांत पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळेल, असे मानले जाते. पंकजा मुंडे या भाजपच्या मास लिडरपैकी एक असून, त्या महिला नेत्याही आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग मराठवाड्यासह नगर, नाशिक आणि बुलढाणा जिल्ह्यात आहे. त्यांचा विधानसभेला राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव झाला. 

धनंजय मुंडेंना कॅबीनेट मंत्रीपदासह जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भेटले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना ज्यापद्धतीने पुर्वी राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेतेपद दिले. तसे आता पंकजा मुंडे यांनाही भाजपकडून उमेदवारी मिळेल, असे मानले जात आहे. भाजपला चौथा उमेदवार निवडून आणण्यासाठी जरी कमी मते असली, तरी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाही सॉफ्ट कॉर्नर राहील, असे मानले जाते. 

खैरे म्हणतात, मी मरेपर्यंत....

कारण, राज्यात जसे महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हापासून पंकजा मुंडे यांनी कायम ठाकरेंचे कौतुक केले किंवा अपेक्षा केली, परंतु कधीही टीका केलेली नाही. तसेच शरद पवार यांच्या बाबतही आहे. त्यामुळेही पंकजा मुंडे यांचा दावा अधिक बळकट मानला जातो. पण, मधल्या काळात त्यांचे समर्थक भागवत कराड यांना राज्यसभेवर संधी मिळाली. 

त्यामुळे दोघेही मराठवाड्याचे आणि ओबीसीच हा मुद्दाही समोर येत आहे. तर, भाजप सरकारवर तुटून पडण्याचा प्रयत्न करत असताना पंकजा मुंडे गप्प राहतात हा देखील मुद्दा उपस्थित होऊ शकतो. परंतु, त्यांना संधी मिळेल आणि परळीला तिसरा आमदार मिळेल अशी अपेक्षा परळीकरांना आहे.