esakal | परभणी : महाबीजच्या कार्यालयावर बोगस बियाणे फेकले ; बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

भाजपचे जेष्ठ नेते बबनराव लोणीकर यांनी शनिवारी (ता.२९) दिला. येथील जिंतूर रस्त्यावरील महाबीजच्या कार्यालयासमोर भाजपच्यावतीने निदर्शने करण्यात आली.

परभणी : महाबीजच्या कार्यालयावर बोगस बियाणे फेकले ; बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : बोगस बियाण्यांच्या विक्री प्रकरणी महाबीजेच व्यवस्थापकीय संचालकांसह व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत अन्यथा अकोला महाबीजच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा माजी मंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते बबनराव लोणीकर यांनी शनिवारी (ता.२९) दिला. येथील जिंतूर रस्त्यावरील महाबीजच्या कार्यालयासमोर भाजपच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी महाबीज कार्यालयावर बोगस बियाणे फेकले

माजीमंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर, माजी आमदार अ‍ॅड.विजयराव गव्हाणे, भारतीय जनता युवा मोर्चाचेप प्रदेश सरचिटणीस राहूल लोणीकर, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सर्जेराव जाधव, जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, गणेशराव रोकडे, प्रमोद वाकोडकर, अजय गव्हाणे, रामकिशन रौंदळे, अभय चाटे, शिवहरी खिस्ते, लिंबाजीराव भोसले, भीमराव वायवळ, मधुकर गव्हाणे, उमेश देशमुख, अनुप शिरडकर, सुनिल देशमुख, राजेश देशमुख, भागवत बाजगीर, बाळासाहेब फले, डी.एस.कदम, बाळासाहेब भालेराव, चंद्रकांत चौधरी, बाळासाहेब जाधव, चंद्रकांत डहाळे, सादेक अली इनामदार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत महाबीज कार्यालयाचा परिसर दणाणुन सोडला. 

हेही वाचा -  Video- उद्धवा, आता तरी उघड मंदिराचे दार; नांदेडमध्ये भाजपचे घंटानाद आंदोलन -

सर्वसामान्य शेतक-यांची अक्षरक्षः पिळवणुक केली

महात्मा फुले विद्यालयापासून बैलगाडीद्वारे महाबीजच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. तेथील प्रवेशद्वारावर ठाण मांडून या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाबिजच्या कार्यालयावर बोगस बियाणे फेकण्यात आले. श्री. लोणीकर म्हणाले, गेल्या व यावर्षी महाबीजसह अन्य कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर बोगस बियाणे विक्री करीत सर्वसामान्य शेतक-यांची अक्षरक्षः पिळवणुक केली आहे. केवळ चार जिल्ह्यातच 27 हजार क्विंटल बोगस बियाणे विक्री झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्वतःहून या प्रकरणात याचिका दाखल केली.

येथे क्लिक करा - मराठवाड्यात मंगळवारपासून परभणीच्या खासदारांचे स्वाक्षरी मोहीम, कशासाठी ते वाचा... 

महाबीजसह अन्य खासगी कंपन्यांविरूध्द गुन्हे नोंद

संबंधीत कंपन्याविरूध्द गुन्हे दाखल करावेत, असे आदेश दिले. त्याही पलीकडे दोषी अधिका-यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करा, अशा कडक सुचना सुध्दा दिल्या. या प्रकरणात महाबीजसह अन्य खासगी कंपन्यांविरूध्द गुन्हे नोंद झाले आहेत. असे असतांनाही राज्य सरकारद्वारे महाबीजच्या मुजोर अधिका-यां विरूध्द अद्यापपर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही ही गंभीर बाब आहे. दोषी अधिका-यांना विरूध्द तात्काळ पोलिसी कारवाई झाली पाहिजे, तसेच सर्वसामान्य शेतक-यांना नुकसान भरपाई सुध्दा मिळाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी व्यक्त केली.

संपादन - प्रल्हाद कांबळे