परभणी : ग्रामपंचायतीसाठी उमेदवारांची रात्र वैर्‍याची; गावागावात चर्चा सत्तांतर होणार

विलास शिंदे
Thursday, 14 January 2021

तालुक्यात पहिल्या टप्यात होत असलेल्या ६७ ग्रामपंचायती पैकी बारा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असल्याने ५५ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी ( ता.१५ ) रोजी मतदान होणार आहे.

सेलू (जिल्हा परभणी ) : तालुक्यात ५५ ग्रामपंचायतीसाठी होत असलेल्या निवडणूकांसाठी ६५ हजार १८३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. १६८ वाॅर्डातून ५६१ महिला व ३३९ पुरूष असे नऊशे उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यापैकी ४१० उमेदवारांचीच निवड होणार आहे. यासाठी उमेदवारांसाठी गुरूवार ( ता.१४ ) ची रात्र वैर्‍याची ठरणार असून गावागावात सत्तांतर होणारच अशी मतदारात चर्चा होतांना दिसत आहे.

तालुक्यात पहिल्या टप्यात होत असलेल्या ६७ ग्रामपंचायती पैकी बारा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असल्याने ५५ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी ( ता.१५ ) रोजी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.५५ ग्रामपंचायती पैकी तालुक्यात नऊ ग्रामपंचायती अतिसंवेदनशील आहेत.

५५ ग्रामपंचायतीसाठी ४१० सदस्य निवडीसाठी १६८ वाॅर्डात १७४ मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. ग्रामपंचायत निवडणूकांसाठी आज शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांना रात्र जागून काढावी लागत आहे. त्यासाठी उमेदवारांनी लक्ष्मी अस्र बाहेर काढले असून घराघरात लक्ष्मी अस्र कसे पोहोचेल याचा बंदोबस्त उमेदवार करत आहेत. उमेदवारांची अशी समज होवू लागली आहे की, गावाच्या विकासाएैवजी लक्ष्मी अस्र सोडले की,आपणच निवडूण ऐवूत. 

हेही वाचाहुश्श...सुटले बुवा एकदाचे...मुरुंब्यातील त्या 28 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह

संक्रातीच्या वाणात सोण्याचे वाण...

महिलांचा मकर संक्रातीचा सण ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत आल्याने तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीसाठी निवडणूक रिणंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांनी आपल्याच मतदान मिळावे याहेतूने महिला मतदांराना थेट संक्रातीचे वाण म्हणून सोन्याचे चार चार मन्याचे वाटप करण्यास सुरूवात केली आहे.तर अनेकांनी प्रत्येक मतदानासाठी रोख दोन हजार रूपयांचे वाटप सुरू केल्याची चर्चा मतदाराकडून होतांना दिसत आहे.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: Candidates for Gram Panchayat have a nightmare parbhani news