परभणी : कोरोनाच्या लसीकरणासाठी सीईओ उतरले रस्त्यावर

file photo
file photo

परभणी : ग्रामीण भागातील नागरिकांचा कोरोना पासून बचाव व्हावा आणि जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोनाचे लसीकरण करून घ्यावे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे सोमवारी (ता.२२) रस्त्यावर उतरून लोकांमध्ये जाणीवजागृती केली.

ताडकळस (ता.पूर्णा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. टाकसाळे यांनी भेट दिली. यावेळी गावातील लोकांचा  कोरोनाच्या लसीकरणाला पुरेसा प्रतिसाद दिसला नाही. तेव्हा त्यांनी रस्त्यावर उतरून व गल्लोगल्ली फिरून आणि प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधून गावातील जेष्ठ नागरिकांना कोरोनाच्या प्रादुर्भावा पासून बचाव व्हावा म्हणून ही लस किती फायदेशीर आहे आणि ती लस प्रत्येक नागरिकांनी घेण्याची विनंती यावेळी शिवानंद टाकसाळे यांनी केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या आवाहनाला गावातील जेष्ठ मंडळींनी देखील चांगला प्रतिसाद दिला आणि शंभर पेक्षा अधिक लोकांनी कोरोनाची लस घेतली लस घेण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत चालू होती.

शिवानंद टाकसाळे यांनी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या अगोदरच स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत.

यावेळी स्वच्छ भारत मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, जिल्हा आरोग्य अधिकारी शंकरराव देशमुख, सभापती अशोक बोकारे, जिल्हा परिषद सदस्या इंदूबाई अंबोरे, गट विकास अधिकारी अमित राठोड, सरपंच गजानन आंबोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप काळे, डॉ. सोनवणे, पत्रकार सुरेश मगरे, ग्राम विकास अधिकारी सय्यद जावेद, संवाद तज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाने विशेषतः ज्येष्ठ मंडळींनी कुठल्याही अफवांना बळी न पडता कोरोनाचे लसीकरण तात्काळ करून घ्यावे. नागरिकांच्या चांगल्या आरोग्याच्या दृष्टीने ते खूप महत्त्वाचे आहे

- शिवानंद टाकसाळे , मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com