Parbhani Crime News
Parbhani Crime Newsesakal

Parbhani|परभणीत पोलिस मुख्यालयातच चोरीच्या घटना, सुरक्षितता वाऱ्यावर

परभणीत गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र सुरु झाले आहे.

परभणी : शहरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र सुरु झाले आहे. दरोडे, घरफोड्या, दुचाकींच्या चोऱ्या होत आहेत. जिल्ह्याचे ठिकाण असलेले पोलिस (Police) मुख्यालय देखील सुरक्षित नसून सोमवारी (ता.१३) भरदिवसा पोलिस मुख्यालयातून चोरट्यांनी एका मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकाची दुचाकी पळवली. शहरात (Parbhani) चोरीच्या घटनात वाढ झाली आहे. नुकतेच रामनगर व महेंद्रनगर येथे दरोड्याच्या घटना घडल्या असून दरोडेखोरांनी नागरिकांना प्रचंड मारहाण केली आहे. त्यापूर्वी लोकमान्यनगर येथे देखील मोठी चोरी झाली. दररोज छोट्या-मोठ्या चोऱ्या होतच आहेत. त्यामुळे नागरिक धास्तावले असून शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Parbhani Crime Theft Incident In Police Headquarter)

दुचारी चोर देखील सक्रिय

शहरात दुचाकी चोरीच्या घटना देखील वाढत चालल्या आहेत. झालेल्या चोऱ्यांचा तपासही लागत नसून चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण केल्याचे चित्र आहे. पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर मोठ्या संख्येने नागरिक सकाळ-सायंकाळ फिरण्यासाठी येत असतात. तेथील वातावरण, परिसर देखील सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. सोमवारी (ता.१३) पहाटे नाथनगर येथे वृत्तपत्र छायाचित्रकार योगेश गौतम हे नेहमीप्रमाणे मुख्यालयाच्या मैदानावर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. फिरून आल्यानंतर त्यांना आपली वडाच्या झाडाखाली लावलेली दुचाकी (एमएच 22 एससी-1319) त्यांना आढळून आली नाही. त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतु दुचारी न सापडल्यामुळे त्यांनी नानलपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Parbhani Crime News
सुहास दाशरथेंची हकालपट्टी! राज ठाकरेंच्या दौऱ्यावेळी मोठी कारवाई

पोलिस मुख्यालयाच असुरक्षित?

जिल्ह्याचे पोलिस मुख्यालयाच्या सुरक्षेवरच अशा चोऱ्यांमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या ठिकाणी अधिकारी, पोलिस कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. तसेच वाहनांचे गॅरेज, डॉग स्कॉड युनिट देखील याच परिसरात आहे. विशेष म्हणजे पोलिसांचे शस्त्रागार, पोलिस प्रशिक्षण केंद्र देखील येथे आहे. त्याच बरोबर पोलिस परेड मैदान देखील असून येथे सातत्याने पोलिस कर्मचाऱ्यांचा राबता असतो. तसेच या मुख्यालय परिसरात शिक्षण विभागाचे गटसाधन केंद्र आहे. त्यामुळे या परिसरातून दिवसभर सर्वसामान्य नागरिकांचा राबता असतो. एवढा महत्त्वाचा परिसर असतांना तेथे मात्र खुलेआम जा-ये सुरु असते. असे असतांनाही पोलिस परेड मैदान परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे मात्र बसवले नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Parbhani Crime News
Aurangabad|औरंगाबादेत वर्‍हाडाची बस घाटात कोसळून १ ठार,१० गंभीर जखमी

नागरिकच घेत आहेत सुरक्षेची काळजी

शहरात विविध पोलिस ठाण्याअंतर्गत सुरु असलेली रात्रीची गस्ती देखील कमी झाल्याचे चित्र आहे. रात्रीतून एखाद्या वेळेस ठराविक रस्त्याने सायरन वाजवत जात असल्याचे चित्र आहे. अनेक वेळा तर ते देखील होत नाही. त्यामुळे शहरात रात्रभर टवाळखोर डबल, ट्रीपल सीट फिरतांना दिसून येतात. त्यातील चोर कोण हे ओळखने देखील अवघड झाले आहे. या कारणामुळे आता नागरिकच आपल्या मालमत्ताचे, जीवाचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे दिसून येते. विविध वसाहतींमध्ये नागरिक समुहाने गस्त घालत असून दरोड्याच्या घटनेनंतर महेंद्रनगरात देखील नागरिकांनी गस्त सुरु केली आहे.

मनुष्यबळाची कमतरता

शहरात नानलपेठ, नवा मोंढा, कोतवाली अशी तीन पोलिस ठाणी आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यात किमान १०० मनुष्यबळाची गरज आहे. परंतु तेथील कारभार ६०-७० कर्मचाऱ्यांवरच सुरु असल्याचे सांगितले जाते. शहरात वाढीव पोलिस ठाणे मंजुर झाले. परंतु अद्याप त्यासाठी ठिकाण व मनुष्यबळ मात्र मिळत नसल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com