Tanaji sawant: शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करा

पालकमंत्री तानाजी सावंत यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश
Tanaji sawant
Tanaji sawantsakal
Updated on
Summary

पालकमंत्री तानाजी सावंत यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश

परभणी : ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यातील काही महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. काही महसूल मंडळामध्ये सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. शेतात सखल भागात पाणी साचल्याने पीक वाया गेले आहे. त्यामुळे महसूल विभाग, कृषी विभाग यांनी तत्काळ जायमोक्यावर जाऊन पिकांचे पंचनामे करावे, असे आदेश पालकमंत्री तानाजी सावंत यांनी रविवारी दिले आहेत.

सध्या जिल्ह्यातील बहुतांश भागात सोयाबीनची काढणी सुरू आहे. त्याला परतीच्या पावसाने नुकसान पोचविले आहे. शुक्रवारचा पाऊस शेतकऱ्यांच्या तोंडातील घास पळविणारा ठरला. जिल्ह्यातील सिंगणापूर, दैठणा, परभणी ग्रामीण, पिंगळी, गंगाखेड, महातपुरी, माखणी, राणीसावरगाव, पिंपळदरी, पूर्णा, ताडकळस, लिमला, कात्नेश्वर, चुडावा, कावलगाव, पालम, चाटोरी, बनवस, पेठशिवणी, रावराजूर, सेलू, देऊळगाव, सोनपेठ, आवलगाव, वडगाव, केकरजवळा या २४ मंडळांतील शेतशिवार पावसाने झोडपून काढले.

जुलैत जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसाने शिवारातून वाहणाऱ्या छोट्या नद्या, नाल्या, ओढे यांना पाणी येऊन त्यामुळेही मोठे नुकसान झाले. या संदर्भात पालकमंत्र्यांनी रविवारी आदेश पारित केले आहेत. पंचनाम्यांच्या प्रक्रियेतून एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटू नये याचीही दक्षता घेण्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना दिल्या.

त्यानुसार महसूल विभाग व कृषी विभाग यांनी समन्वयाने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कामाला प्रत्यक्षपणे सुरुवात केली आहे. पीकविमा योजनेत सहभाग नोंदविलेल्या शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यास पूर्वसूचना देण्याचे आवाहन पालकमंत्री श्री. सावंत यांनी केले आहे.

सद्यःस्थितीत सोयाबीन पिकाची काढणीस सुरुवात झाली आहे; तसेच तूर व कपाशी शेतात वाढीच्या अवस्थेत आहे. या अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले असल्यास पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या अधिसूचित पिकांबाबत नुकसान भरपाई लागू आहे.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भुस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या अधिसूचित पिकाचे नुकसान हे वैयक्तिक पंचनामे करून निश्चित करण्यात येते.

काढणी पश्चात नुकसान याबाबी अंतर्गत जास्तीत - जास्त १४ दिवस (काढून ठेवल्यापासून दोन आठवड्यापर्यंत) गारपीट, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस व अवकाळी पावसापासून नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल.

नुकसानीच्या ७२ तासांत customersupport@icicilombard.com या ई-मेल, क्रॉप इन्शुरन्स अॅपवर किंवा १८००१०३७७१२३ टोल फ्री क्रमांकावर कॉल करून पूर्वसूचना पीकविमा कंपनीला देणे बंधनकारक आहे अथवा ऑनलाइन पद्धतीने पूर्वसूचना देण्यास अडचणी येत असल्यास ऑफलाइन पद्धतीने पीक विमा कंपनीचे जिल्हा व तालुका कार्यालयात तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे लेखी स्वरूपात नोंदवावी.

- तानाजी सावंत, पालकमंत्री, परभणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com