esakal | Parbhani: विजयादशमीनिमित्त बाजारपेठेत तेजी
sakal

बोलून बातमी शोधा

market

परभणी : विजयादशमीनिमित्त बाजारपेठेत तेजी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी : नवरात्रोत्सवातील नववी माळ पूर्ण झाली असून, शुक्रवारी (ता. १४) विजयादशमी अर्थात दसरा साजरा होणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या दिवशी ग्राहक नवनवीन वस्तुंची खरेदी करतात. त्यासाठी सोने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि वाहनांची दुकाने सजली आहेत. विजयादशमीला गुंजभर तरी सोने खरेदी करावे, अशी परंपरा असल्याने सोने बाजार चांगलाच तेजीत असणार आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तापासून खरेदीला मोठ्या प्रमाणात सुरुवात होते. गेली दोन वर्षे बाजारपेठेवर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे उलाढाल कमी झाली होती. सोने बाजारात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापारीवर्गाने वेगवेगळ्या सवलतींच्या योजना देऊ केल्या आहेत.

हेही वाचा: Pune : जांभूळवाडी दरी पुलावर भीषण अपघात; एक ठार, एक गंभीर

केवळ दसराच नव्हे तर दिवाळी व लग्नसराईसाठी देखील आताच खरेदी होण्याची शक्यता आहे. टीव्ही, फ्रीज, वातानुकूलित यंत्र, ओव्हन, सीडी, एलसीडी, संगणक यासारख्या वस्तू खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. वाहनांची आगाऊ नोंदणी मोठ्या संख्येने झाली आहे. कपडा मार्केटही चांगले आहे. त्यामुळे यंदा कोरोनाचे सावट थोडे कमी झालेले जाणवत आहे. याचा चांगला परिणाम यंदा व्यापारावर दिसून आला आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या खरेदीसाठी म्हणावी तशी तेजी नसली तरी कापड व वाहनांच्या खरेदीसाठी लोकांची गर्दी दिसून येत आहे.

झेंडूच्या फुलांना मागणी

यंदाच्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने झेंडूच्या फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे बाजारपेठेत फुलांची आवक चांगली आहे. विजयादशमीला तोरण, गाड्यांना माळा घालण्याकरिता झेंडूच्या फुलांना मागणी असते. नवरात्रोत्सवाच्या नवव्या माळेला आकाराने लहान असलेला झेंडू ६० ते ८० रुपये किलो दराने विकल्या गेला. झेंडूच्या फुलांची आवक जिल्ह्यासह बाहेर जिल्हयातून ही मोठ्या प्रमाणात झाली आहे.

loading image
go to top