परभणीतील जलकुंभात आढळला मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parbhani death body found in water tank

परभणीतील जलकुंभात आढळला मृतदेह

परभणी : शहरातील अमेयनगर भागातील महापालिकेच्या जलकुंभात एका व्यक्तीचा मृतदेह गुरूवारी दुपारच्या सुमारास आढळून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेख आयुब शेख अहमद असे मृताचे नाव आहे.

परभणी शहरातील अमेयनगर भागातील या जलकुंभातील पाण्याचा स्तर व गुणवत्ता तपासणी करण्याकरिता कर्मचाऱ्यांचे एक पथक गुरुवारी दुपारी जलकुंभावर चढले होते. या पथकाने सहजपणे जलकुंभात नजर टाकली तेव्हा पाण्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या पथकाने तातडीने महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना दिली. महापालिकेचे अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी लागलीच धावून आले.

पोलिस व अग्निशामक दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जलकुंभातील अज्ञात व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला. दरम्यान मृत व्यक्तीची ओळख पोलिसांनी पटवली असून तो मृतदेह शेख आयुब शेख अहमद नामक व्यक्तीचा असल्याचे समोर आले आहे. ते ता.१९ एप्रिल पासून बेपत्ता होते अशी माहिती मृताच्या नातेवाइकांनी पोलिसांना दिली. दरम्यान जलकुंभात मृतदेह आढळून आल्याने नागरिक हादरले आहेत.

Web Title: Parbhani Death Body Found In Water Tank

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top