esakal | परभणी : हिरव्या भाज्या जेवणातून हद्दपार; भाज्यांच्या किमंती कडाडल्या

बोलून बातमी शोधा

file photo}

. परभणीत कांदा 60 ते 70  रुपये किलोच्या घरात गेला असून, अन्य भाज्यांची विक्रीही सरासरी 80 ते 100 रुपये किलो दराने केली जात आहे.

marathwada
परभणी : हिरव्या भाज्या जेवणातून हद्दपार; भाज्यांच्या किमंती कडाडल्या
sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः सततच्या पावसामुळे भाज्यांची आवक रोडावली आहे. परिणामी भाज्यांच्या किमती कडाडू लागल्या आहेत. परभणीत कांदा 60 ते 70  रुपये किलोच्या घरात गेला असून, अन्य भाज्यांची विक्रीही सरासरी 80 ते 100 रुपये किलो दराने केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जेवणातून हिरवे पालेभाज्या हद्दपार झाल्या आहेत. भाज्यांच्या किमंती कडाडल्याने सर्वसामान्याचे बजेट कोलमडले आहे.

परभणी जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पाऊस सुरु झाला आहे. या पावसाचा विपरित परिणाम भाजीपाल्याच्या उत्पन्नावर दिसून आला आहे. अनेक ठिकाणी अति पावसामुळे भाज्या सडल्या गेल्याने बाजारात भाज्यांची आवक झालीच नाही. परिणामी भाज्याचे भाव गगनाला भिडले आहेत. परभणी शहराला भाज्यांचा सर्वाधिक पुरवठा हा नाशिक, हैदराबाद येथील बाजारामधून होतो. नाशिक, नगर तसेच नांदेड जिल्ह्याच्या काही भागातून भाज्यांची आवक होती. पण यंदा या सर्वच भागात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. त्यामुळे भाज्या लवकर खराब होऊ लागल्या आहेत. परिणामी भाज्यांची आवक रोडावली आहे. त्यातून दरवाढ होत आहे. परभणी बाजारपेठेतील घाऊक व्यापाऱ्यांनी सांगितले की, 'भाज्यांची आवक रोज दोन ते चार टक्के कमी होत आहे. ज्या भाज्या बाजारात पोहोचतात त्यातीलही 30 ते 40 टक्के माल खराब असतो. त्यामुळे भाज्यांची दररोज दरवाढ होत आहे. प्रामुख्याने कांदा, बटाटा, भेंडी, कोबी या सर्वाधिक मागणीच्या भाज्यांचे दर रोज किलोमागे 1 ते 3 रुपयांनी वधारत आहेत.'

हेही वाचा -  एसीबीचा व्हाईस रेकॉर्डर घेऊन पळणारा लाचखोर पोलिस कोठडीत -

सर्वच भाज्या किरकोळ बाजारात 100 रुपये किलोच्यावर जाण्याची शक्यता

भाजी आणण्याचा सरासरी खर्च किलोमागे सहा ते आठ रुपये असतो. यामुळे भाज्यांचे घाऊक दर दररोज सहा ते आठ रुपये वधारल्यास किरकोळ बाजारात ही वाढ 12 ते 14 रुपये होते. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास सर्वच भाज्या किरकोळ बाजारात 100 रुपये किलोच्यावर जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

भाज्याचे भाव वधारल्याने सर्वसामान्याचे आर्थिक बजेट कोलमडले

दरम्यान, भाज्याचे भाव वधारल्याने सर्वसामान्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. दररोजच्या जेवणात भाज्यांचा वापर करावा की नाही हा विचार देखील सुरु आहे. परंतू भाज्या तर खाव्याच लागणार आहे. सध्याच्या कोविडच्या परिस्थितीत हा भाव वधारणे सर्वसामान्य नागरीकांना परवडणारे नाही अशी प्रतिक्रिया एका गृहिणीने व्यक्त केली.

येथे क्लिक करा - वेतनाच्या मागणीसाठी शिक्षकाने मांडला शाळेतच संसार -

प्रमुख भाज्यांचे दर (प्रति किलोनुसार)

टोमॅटो 40 रुपये, मिरची 60 रुपये, पालक 80 रुपये, कद्दु 40 रुपये,शेवगा 120 रुपये, कांदा 40 रुपये, कोथिंबिर 150 रुपये, कोबी 80 रुपये, किलोफ्लॉवर 100 रुपये, भेंडी 80 रुपये, ढोबळी मिरची 80 रुपये.

संपादन- प्रल्हाद कांबळे