सेलूत जिल्हा बँकेची पाच लाखांची रोकड लुटली, दोन लाख फेकले रस्त्यावर | Parbhani Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parbhani District Cooperative Bank

सेलूत जिल्हा बँकेची पाच लाखांची रोकड लुटली, दोन लाख फेकले रस्त्यावर

सेलू (जि.परभणी) : डासाळा (ता.सेलू) येथील परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (Parbhani District Cooperative Bank) शाखेत पाच लाखांची रोकड दुचाकीवरुन घेऊन जाणार्‍या कर्मचाऱ्यांजवळील रोकड दोन अज्ञात चोरट्यांनी लुटली. मंगळवारी (ता.चार) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, पोलीस आणि कर्मचारी चोरट्यांचा पाठलाग करत असताना रूढी ( ता.मानवत ) पाटीजवळ चोरट्यांनी पावणे दोन लाख रुपये रस्त्यावर फेकले. याबाबत सेलू पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार डासाळा (ता.सेलू ) (Selu) येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे शाखाधिकारी केशव मांडे आणि रोखपाल बालासाहेब जाधव हे सेलू (Parbhani) येथील पाथरी रस्त्यावरील मुख्य शाखेतून मंगळवारी डासाळा येथे बँकेतील ग्राहकांना रक्कम वितरित करण्यासाठी दुचाकीवरुन जात होते.(Parbhani District Bank's Five Lakh Rupees Looted In Selu)

हेही वाचा: Jalna Riot : जालन्यात दंगल, एक जण गंभीर जखमी; परिस्थिती नियंत्रणात

देऊळगाव (गात) पाटीजवळ विना क्रमांकाच्या दुचाकीवरुन दोन अज्ञात चोरट्यांनी कर्मचार्‍यांच्या डोळ्यात स्प्रे मारून रक्कम असलेली पिशवी घेऊन मानोलीमार्गे धुम ठोकली. पंरतु, दोन्ही कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून पोलीसांना माहिती देऊन चोरट्यांचा पाठलाग केला. तातडीने पोलीस उपनिरीक्षक साईनाथ अनमोड, पोलीस कर्मचारी उमेश बारहाते, आप्पा वराडे, शेख गौस यांनी पाठलाग सुरू केला. पाठलाग सुरू असल्याचे चोरट्यांच्या लक्षात येताच लक्ष विचलित करण्यासाठी रूढी पाटी (ता.मानवत, जि.परभणी) येथे दुचाकीवरुन पावणे दोन लाख रुपये रस्त्यावर फेकले.

हेही वाचा: Dhiraj Deshmukh : आमदार धीरज देशमुख यांना कोरोनाची लागण

पोलीसांनी फेकलेली रक्कम ताब्यात घेऊन पाठलाग सुरूच ठेवला. पंरतु, दुचाकीवर असलेले अज्ञात चोरटे मानवत मार्ग परभणीकडे उर्वरित रक्कम घेऊन पसार झाले आहेत. चोरट्यांचा तपास सुरु असल्याची माहिती सेलू पोलिसांनी दिली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Parbhani
loading image
go to top