परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेवर वरपूडकर गटाचे वर्चस्व

file photo
file photo

परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार सुरेश वरपूडकर यांच्या गटातील 12 सदस्य विजयी झाले. तर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या गटाकडे 09 जागा आल्या आहेत. या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यातील पाच ही आमदार, दोन माजी आमदार व एक माजी खासदार यांचा समावेश आहे.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंच वार्षिक निवडणुकीच्या मतदानाचे निकाल मंगळवारी (ता. २३) जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत आमदार वरपूडकर व माजी आमदार बोर्डीकर या दोन मत्ताबर नेत्याच्या गटामध्ये अटीतटीची लढाई झाली. यात वरपूडकर गटाचे 12 संचालक विजयी झाले आहेत. वरपूडकर गटाच्या विजयी संचालकामध्ये आमदार सुरेश वरपूडकर, आमदार राजू नवघरे, माजी आमदार सुरेश देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर, गणेशराव रोकडे, प्रेरणा वरपूडकर, विद्यमान अध्यक्ष पंडितराव चोखट, भगवानराव वाघमारे, अतुल सरोदे व राजेश पाटील गोरेगावकर, बालाजी देसाई यांचा समावेश आहे.

माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर गटाचे स्वतः माजी रामप्रसाद बोर्डीकर, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार बाबजानी दुराणी, माजी खासदार शिवाजी माने, भाजप जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, भावना कदम बोर्डीकर यांचा समावेश आहे.

समसमान मते पडल्याने फेर मतमोजणी

विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या मतदार संघातून बोर्डीकर गटाचे दत्तात्रय मायनदले व वरपूडकर गटाचे स्वराज सिह परिहार या दोघांना 761 - 761 मते मिळाली. त्या मुळे या मतदार संघातील मतमोजणी पुन्हा करावी अशी मागणी परिहार यांनी केली. त्यामुळे ही मतमोजणी परत केली जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com