प्रकल्पांतील पाणीसाठ्यामुळे परभणी जिल्ह्याला यंदा ‘नो टेन्शन’ 

prakalp
prakalp

परभणी ः जिल्ह्यात यंदा गतवर्षीच्या तुलनेत पाणीपातळी चांगली राहिली असून मोठ्या प्रकल्पासह लघू पाटबंधारे विभागाचे पाच तलाव वगळता अन्य १५ तलावांत जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे.

गतवर्षी मे महिन्यात जिल्ह्यातील पाणीपातळी खोलवर गेली होती. दुष्काळी स्थिती असल्याने अनके प्रकल्प जानेवारीतच मृतसाठ्यात गेले होते. काही प्रकल्प पावसाळ्यातच पाणीसाठा नव्हता. त्यामुळे जिल्ह्याला भयंकर अशा पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. गतवर्षी मेअखेरीस ११ लघू प्रकल्प कोरडे पडले होते. तर मासोळी (ता. गंगाखेड) मध्यम प्रकल्प जोत्याखाली आणि करपरा (ता. जिंतूर) प्रकल्प मृतसाठ्यात होता. त्यामुळे गतवर्षी मे महिन्यात जिल्ह्यात ३६७ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. यामध्ये ७० गावे आणि नऊ वाड्या, तांड्यांवर ८७ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सलग २२ दिवस अतिवृष्टी
यंदा गतवर्षीच्या तुलनेत पाण्याची चांगली स्थिती आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये सलग २२ दिवस अतिवृष्टी झाल्याने पाणीपातळी चांगली राहिली. त्यानंतर हिवाळ्यात सतत ढगाळ वातावरण राहिले. तसेच जायकवाडी धरणातून हिवाळा आणि उन्हाळा हंगामासाठी पाणी सोडल्याने विहिरी, नाले भरून राहिले आहेत. त्यामुळे केवळ निम्न दुधना हा मोठा प्रकल्प वगळता मध्यम आणि लघू प्रकल्पांत पावसाळ्यापर्यंत पाणी पुरेल एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदा फारशी टंचाई जानवत नाही.

प्रकल्पातील पाणीसाठा
दुधना प्रकल्पात सध्या जिवंत पाणीसाठा १००.१०३ दलघमी, येलदरी धरणात ५९५.४२० (७३.५ टक्के), सिद्धेश्वर प्रकल्प ४९.८०७ (६२.५ टक्के), मध्यम प्रकल्प असलेल्या करपरा (ता. जिंतूर) प्रकल्पात ८.३७८ (३३.६), मासोळी (ता. गंगाखेड) १४.६०९ (५३.०८) एवढा जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे.

प्रकल्पातील पाणीसाठा 
उच्चपातळीचे बंधारे असलेल्या प्रकल्पातील ढालेगाव बंधारा-५.१९० (३८.४), मुदगल (ता. पाथरी) -३.७८० (३३.३), डिग्रस -३९.७९० (६२.६), निम्न पातळी बंधारे असलेल्या मुळी -०.२७० (१.५६०) जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. लघू पाटबंधारे तलाव असलेल्या झरी (ता. पाथरी) १.३६८, नखातवाडी -०.२४६, तांदूळवाडी (ता.पालम)-०.८७७, गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव -०.७६४, टाकळवाडी -०.२७०, कोद्री -०.९७१, पिंपळदरी -२.७०७, दगडवाडी -०.५५०, डोंगरपिंपळा -०.६७०, भेंडेवाडी (ता. गंगाखेड)-१.०७०, जिंतूर तालुक्यातील देवगाव-२.७०७, बेलखेडा-०.११३, चारठाणा-०.०६९, कवडा-०.२३७, मांडवी ०.०६९ एवढा जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. (सर्व आकडे दलघमीमध्ये)

पाच तलाव जोत्याखाली
पाच लघू पाटबंधारे तलाव जोत्याखाली आहेत. त्यामध्ये पेडगाव, आंबेगाव (ता. परभणी) वडाळी, केहाळ, दहेगाव (ता. जिंतूर), तर जोगवाडा, भोसी, चिंचोली, आडगाव हे प्रकल्प कोरडे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com