Parbhani Fodder Shortage: तब्बल ४.८३ लाख पशुधनापुढे संकट : प्रशासनाचे नियोजन सुरू जिल्ह्यात चाऱ्याचा तुटवडा

Parbhani Fodder Shortage, 4.82 Lakh Livestock, 114 Days : परभणी जिल्ह्यात कमी पावसामुळे खरीप पिकांवर परिणाम झाला असून चाराटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ४ लाख ८२ हजार ९९१ पशुधनासाठी उपलब्ध चारा सुमारे ११४ दिवस पुरेल, असा अंदाज आहे.
Parbhani Fodder Shortage

Parbhani Fodder Shortage

esakal

Updated on: 

परभणी, : पावसाने यंदा ओढ दिल्याने खरीप पिकांवर परिणाम झाला असून, जलसाठ्यांची परिस्थितीही चिंताजनक आहे. त्यातच आता जिल्ह्यातील तब्बल चार लाख ८२ हजार ९९१ पशुधनासमोर चाराटंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. पशुसंवर्धन विभागाच्या ताळेबंदानुसार जिल्ह्यात उपलब्ध, संभाव्य स्रोतांमधून सुमारे दोन लाख ५९ हजार ६६३ मेट्रिक टन चारा उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. मात्र, पशुधनाची सध्याची गरज लक्षात घेता हा चारा केवळ ११४ दिवस पुरेल अशी स्थिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com