परभणीला मिळाली केंद्रीय विद्यालयाची भेट, शिक्षणाचे नवे दालन खुले होणार

गणेश पांडे
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

परभणी : परभणीसारख्या तुलनेने मागास असलेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय सुरू करावे, या मागणीसाठी गेली चार वर्षे सातत्याने दिल्ली दरबारी पाठपुरावा करणारे शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या प्रयत्नाला अखेर यश मिळाले आहे. परभणीला नवे केंद्रीय विद्यालयास 
मान्यता मिळाली आहे.

परभणी : परभणीसारख्या तुलनेने मागास असलेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय सुरू करावे, या मागणीसाठी गेली चार वर्षे सातत्याने दिल्ली दरबारी पाठपुरावा करणारे शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या प्रयत्नाला अखेर यश मिळाले आहे. परभणीला नवे केंद्रीय विद्यालयास 
मान्यता मिळाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.1) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेना खासदारांच्या पाठपुराव्याची दखल घेऊन, परभणीत केंद्रीय विद्यालयाला मंजुरी दिली. परभणी सारख्या मराठवाड्यातील मागास जिल्हयात केंद्रीय विद्यालय सुरू व्हावे जेणेकरून तिथे शिक्षणाचे नवे दालन खुले होईल आणि ग्रामीण भागातील विद्यार्थायंना शिक्षणाची उचित संधी मिळेल, या उद्देशाने खासदार संजय जाधव यांनी केंद्रीय विद्यालायच्या मागणीसाठी लोकसभेत अनेकदा आवाज उठवला 
होता.

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन, केंद्रीय विद्यालयासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याची फलश्रुती आज झाली आहे. नव्या केंद्रीय विद्यालयामुळे परभणीतील अनेक विद्यार्थयांना त्याचा लाभ होणार आहे. दरम्यान, परभणीत केंद्रीय विद्यालयाला मंजूरी दिल्याबद्दल खासदार संजय जाधव यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री 
प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.तसेच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख तसेच शिवसेना नेते अदित्य ठाकरे यांचेही खासदार जाधव यांनी आभार मानले आहेत.

परभणीत शिक्षणाचे नवे दालन सुरू होईल : खासदार जाधव
परभणीमध्ये केंद्रीय विद्यालय सुरू व्हावे, ही माझी सुरूवातीपासूनची मागणी होती. परभणीत कृषी विद्यापीठ आहे. त्यातून दिशादर्शक काम आजवर झाले आहे. केंद्रीय विद्यालयामुळे परभणीत शैक्षणिक क्रांती होईल, असा आशावाद 
खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केला आहे.
 

Web Title: parbhani get a gift from kendriya vidyalaya