
मात्र विकास कामे करणारे काही सत्ताधिकारी मात्र कायम राहिले आहेत.या निवडणूकीत अनेक गावात गड गेला पण सिंह आला म्हणण्याची वेळ पुठार्यांवर आली आहे.
सेलू (जिल्हा परभणी ) : तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतची मतमोजणी सोमवारी ( ता. १८ ) रोजी मतदान झाले. ५५ ग्रामपंचायत मधील १६८ प्रभागातील ४१० उमेदवार निवडूण आले.बहुतांश ठिकाणी सत्ताधार्यांना मतदारांनी डावलले आहे. मात्र विकास कामे करणारे काही सत्ताधिकारी मात्र कायम राहिले आहेत.या निवडणूकीत अनेक गावात गड गेला पण सिंह आला म्हणण्याची वेळ पुठार्यांवर आली आहे.
तालुक्यात पहिल्या टप्यातील ६७ ग्रामपंचायतीच्यापैकी बारा ग्रामपंचायती सुरूवातीसच बिनविरोध झाल्या. उर्वरित ५५ ग्रामपंचायतीसाठी ( ता.१५ ) रोजी मतदान झाले. मतदानाचा निकाल सोमवारी ( ता.१८ ) रोजी जाहिर झाला.गावपातळीवरिल या ग्रामपंचायतीच्या निवडणूकांमध्ये अनेक गावात सत्तांतर झाले तर अनेक गावात पूर्वीच्याच पुढार्यांना पसंती देत मतदारांनी त्यांच्या पॅनलला निवडूण दिले.
मतदार संघाच्या आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर,राष्र्टवादीचे माजी आमदार विजय भांबळे या दोन्ही नेत्यांच्या पॅनलमध्ये तुल्यबळ लढत यावेळेस पाहावयास मिळाली.बहूतांश गावात या नेत्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या कार्यकर्त्यांनी स्वत:च्या जिवाचे रान केले.कधी नव्हे ते या ग्रामपंचायत निवडणूकीत मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी अस्र चालले.संक्रातचे औचित्य साधून उमेदवारांनी सोन्या,चांदीच्या वस्तुंचे वाटप केले.तर अनेक उमेदवारांनी बाहेरगावी असलेल्या मतदानासाठी त्यांची ये- जा करण्यासाठी वाहणे, त्यांची जेवणाची व्यवस्था व वरून जातांना लक्ष्मीचे दर्शन त्यांनाही घडविले.
त्यामूळे अनेक गावात अगदी कमी फरकांने उमेदवार विजयी झाले.त्यामूळे पुठार्याच्या पॅनलची गणिते हूकली.विरोधी गटाकडे विजयी उमेदवारांची जास्त संख्या झाली.तर अनेक गावात सरंपच पदाचे पहिले सुटलेल्या आरक्षणा प्रमाणे तो आरक्षण पदासाठीचा उभा असलेला उमेदवारच या निवडणूकीत पडल्यामूळे या गावातील पुठार्यांना गड गेला पण सिंह आला म्हणण्याची वेळ आली आहे.
आरक्षण पदाचा तिढा कायमच...
तालुक्यातुल ५५ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत अनेक गावात प्रतिस्पर्धी पॅनलपेक्षा एक का होईणा जास्त उमेदवार निवडूण आले आहेत.परंतु कोणत्या जातीसाठी आरक्षण सुटते.व तो उमेदवार आपल्या पॅनल मधून निवडूण आला आहे का याची चिंता गावपातळीवरील पुठारी करित आहेत.
संपादन - प्रल्हाद कांबळे