Parbhani : जिंतूर तालुक्यात तीन वर्षांत ५४ शेतकऱ्यांची आत्महत्या

सततच्या नापिकीमुळे उचलले टोकाचे पाऊल
Jintur
Jintursakal

जिंतूर : सततची नापिकी, डोक्यावर कर्ज, कर्जफेडीसाठी बँकांचा तगादा यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या तालुक्यातील ५४ शेतकऱ्यांनी तीन वर्षांत आत्महत्या केली. यात यावर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.

भौगोलिकदृष्ट्या जिंतूर तालुक्यातील बहुतांश भाग डोंगराळ आहे. हा परिसर मुरुमाड व हलक्या जमिनीचा आहे. शिवाय सिंचन व्यवस्था फारच तोकडी असल्याने शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे पीक उत्पादन कमी होते. यातच मागील तीन वर्षांपासून कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ पडत आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे पिके शेतकऱ्यांच्या हाती लागले नाहीत. परिणामी, सततच्या नापिकीमुळे शेतकरी आर्थिक सापडला असल्याने डोक्यावर बॅंकेचे, खासगी कर्जफेड मुलांचे शिक्षण, मुलामुलींचे लग्न कर्तव्य या व इतर दैनंदिन प्रापंचिक समस्यांच्या विळख्यात गरीब, सर्वसामान्य शेतकरी सापडला. यातून बाहेर पडण्याची वाट बिकट दिसत असल्याने तीन वर्षांत ५४ शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

कुटुंबाला आर्थिक मदत

शासनाच्यावतीने अलीकडे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पंधरा कुटुंबाला महसूल प्रशासनामार्फत मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले. त्याचप्रमाणे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना आत्मनिर्भर होण्यासाठी, रोजगार उपलब्धतेसाठी शासनातर्फे कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनो, जीवन अनमोल

आत्महत्येमुळे एकाच व्यक्तीचा जीव जातो, असे नाही तर घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर कुटुंबच उघड्यावर येते. मुला-बाळांचे हाल होतात. त्यामुळे टोकाचा निर्णय घेऊच नये. आपल्या आसपास जर अशा पद्धतीने कुणी नैराश्यात आढळले तर त्याच्याशी संवाद वाढवा. अडचणी समजून घ्या. गरज पडल्यास मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जा. आज असलेली परिस्थिती उद्या नसणार आहे. त्यामुळे आजच्या परिस्थितीमुळे हताश होऊ नका, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ देत आहेत.

आकडे बोलतात...

वर्ष : आत्महत्या

२०१९ : १६

२०२० : २१

२०२१ : १०

२०२२ : ०७

एकूण : ५४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com