परभणीत पहिल्या दोन तासांत १.७२ टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

दोन्ही जिल्ह्यांत पाच मतदारांनी हक्क बजावला असून कळमुरी आणि हिंगोली केंद्रावर अनुक्रमे तीन व एका जणाने मतदान केले. उर्वरित एका मतदानाची नोंद परभणी केंद्रावर झाली. अन्य गंगाखेड, पाथरी, सेलू, वसमत केंद्रावर एकही मतदार सकाळी दहा वाजेपर्यंत फिरकला नव्हता.

परभणी : परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात पहिल्या दोन तासांत केवळ १.७२ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. वास्तविक सकाळी दहा वाजल्यानंतर मतदानाची गती वाढली.   

दोन्ही जिल्ह्यांत पाच मतदारांनी हक्क बजावला असून कळमुरी आणि हिंगोली केंद्रावर अनुक्रमे तीन व एका जणाने मतदान केले. उर्वरित एका मतदानाची नोंद परभणी केंद्रावर झाली. अन्य गंगाखेड, पाथरी, सेलू, वसमत केंद्रावर एकही मतदार सकाळी दहा 
वाजेपर्यंत फिरकला नव्हता.

त्यानंतर परभणी दिग्जांनी मतदान केले. महापौर मिनाताई वरपूडकर, उपमहापौर माजू लाला, गटनेते भगवान वाघमारे, स्थायी समिती सभापती गणेश देशमुख, परभणी  बाजार समितीचे सभापती समशेर वरपूडकर यांनी एकत्रित मतदान केले. दरम्यान, उमेदवार सुरेश देशमुख, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, माजी नगराध्यक्ष बंडू पाचलिंग यांनी केंद्रास भेट दिली. तदनंतर शिवसेनेचे खासदार संजय जाधव, प्रभाकर वाघीकर, नगरसेवक अतूल सरोदे, चंदू शिंदे, अनिल पतंगे केंद्रावर गेले होते. 

Web Title: Parbhani legislative council election

टॅग्स