esakal | परभणी : लोअर दूधना ८५ टक्के भरले, सेलु तालुक्यात पावसाचा हाहाकार
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

लोअर दूधना प्रकल्पात ८०.०३ टक्के इतका जलसाठा जमा झाला आहे. तसेच तालुक्यात सर्वत्र मध्यम ते जोरदार पाऊस पडल्याने शेतीची मोठी नुकसान झाली.

परभणी : लोअर दूधना ८५ टक्के भरले, सेलु तालुक्यात पावसाचा हाहाकार

sakal_logo
By
विलास शिंदे, संजय मुंडे

सेलू (जिल्हा परभणी) : तालूक्यातील लोअर दूधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात तब्बल चार वर्षानंतर यावर्षी समाधानकारक पाऊस होत असल्याने (ता.१८) रोजी पर्यंत लोअर दूधना प्रकल्पात ८०.०३ टक्के इतका जलसाठा जमा झाला आहे. तसेच तालुक्यात सर्वत्र मध्यम ते जोरदार पाऊस पडल्याने शेतीची मोठी नुकसान झाली. तालुक्यातील करपरा नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. याच काळात वीजपुरवठा खंडीत झाल्याने अनेक गावे अंधारात गेली.

यावर्षी लोअर दूधना प्रकल्प धरणात (ता. १९) जूनपासूनच पाण्याची आवक सुरू झाली. ता.१८ सप्टेंबरपर्यंतच ८०.०३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची अपेक्षा आहे. लोअर दूधना प्रकल्पाच्या पाणी पातळीवर जिल्ह्यातील सेलू शहरासह दूधना नदी काठावरील शेकडो गावांचा पिण्याच्या पाण्याचा पाणी प्रश्न अवलंबून आहे. गेल्या वर्षी आॅक्टोंबर महिण्यात पाऊस होवून दूधना धरणात केवळ वीस टक्केच जिवंत जलसाठा उपलब्ध झाला होता. गेल्या वर्षी दूधना नदी काठावरील शेकडो गावांसह परभणी शहरांसाठी लोअर दूधना प्रकल्पातून पाणी सोडून मोठ्या मूश्किलीने तहान भागवली होती. 

जूलै महिन्यात सर्वाधिक पाणी धरणात जमा 

त्यामूळे लोअर दूधना प्रकल्प मार्च महिण्यातच मृतसाठ्यात गेले होते. परंतू यावर्षी जून महिण्यापासूनच जालना जिल्ह्यात सुरूवातीपासूनच जोरदार पाऊस पडत असल्याने धरणात पाण्याची आवक वेगाने होत आहे. यावर्षी जूलै महिन्यात सर्वाधिक पाणी धरणात जमा झाले. तसेच अधून- मधून होत असलेल्या जोरदार पावसामूळे लोअर दूधना प्रकल्प धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. लोअर दूधना प्रकल्पाच्या जलशयातून सेलू आणि जालना जिल्ह्यातील मंठा, परतूर आणि सत्तर गाव ग्रीड योजनेला पाणी उचलले जाते. 

हेही वाचा -  जायकवाडीचे २७ दरवाजे उघडले, पैठण शहराला पुराचा धोका. -

सप्टेंबर महिन्यातच ८५.०३ टक्के जलसाठा उपलब्ध 

त्यामुळे लोअर दूधना प्रकल्प धरणाच्या पाण्यावर शेकडो गावांच्या पाण्याची मदार अवलंबून आहे. लोअर दूधना प्रकल्पात इ. स.२०१० पासून पाणी आडवले जाते. इ. स.२०१६ मध्ये प्रथमच लोअर दूधना प्रकल्प शंभर टक्के भरला होता. दरवर्षी आॅक्टोंबर अखेरपर्यंत धरणात येणार्‍या पाण्याची नोंद केली जाते. मात्र सप्टेंबर महिन्यातच ८५.०३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. सद्य: स्थितीत लोअर दूधना प्रकल्पात एकूण ३०८.५४३ दलघमी एवढा जलसाठा आहे. यात २०५.९४२ दलघमी जीवंत पाणीसाठा निर्माण झाला आहे.

करपरा नदीला आला पुर

सेलू तालुक्यात शुक्रवारी (ता.१८) रात्री दीड ते तीन वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाने हाहाकार माजला असुन करपरा, दुधना नदीला पूर आला तर ओढ्या- नाल्या जवळील शेत जमीन खरडून गेली असून शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने पावसामुळे झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

 मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी 

मंगळवारी (ता.१५) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पावसाने मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली होती. जवळपास एक तास मुसळधार पाऊस पडला होता. तालुक्यातील वालूर परिसरात गुरुवारी (ता.१७) पाच वाजता जोराचा पाऊस झाला. शुक्रवारी (ता.१८) रात्री झालेल्या जोरदार पावसाने ग्रामीण भागात दानादान उडाली. करपरा दुधना नदीला पूर आला होता. राजेवाडी गावाजवळील दुधना नदीच्या पुलावरून दोन ते तास पुराचे पाणी गेले. रात्रीची वेळ असल्याने वाहतुकीला अडथळा आला नाही.

येथे क्लिक कराअवैध धंद्याचा कर्दनकाळ जयंत मीना- परभणीचे नवे पोलिस अधिक्षक

शेतीसह पिकांना फटका

वारा व मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील उंच वाढलेला कापूस झोपला. उभ्या पिकात पाणीच पाणी झाले. घरावरील पत्र्याच्या नाल्यांतुन पाणी ओसंडून वाहत होते. शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले. 
शेत शिवारातील ओढ्या- नाल्यांना मुसळधार पावसाने पुर येऊन काही ठिकाणी शेत खरडून गेली आहे. मुसळधार पावसाने शेतीसह खरिपाच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. 

वीजपुरवठा खंडित

सेलू तालुक्यातील अनेक गावातील वीजपुरवठा मुसळधार पावसाने खंडित झाला होता. थोडासा पाऊस पडला की खंडित होत असलेल्या वीजपुरवठा तालुक्यातील गावांत नित्याचेच आहे. 
पडलेल्या मुसळधार पावसाने अनेक गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. असून सकाळी बारा वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होण्याची प्रतिक्षा नागरिकांना होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

loading image