esakal | जायकवाडीचे २७ दरवाजे उघडले, पैठण शहराला पुराचा धोका.
sakal

बोलून बातमी शोधा

jaykwadi dam.jpg

नाशिकसह जायकवाडी धरणावरील धरणे ही भरु वाहू लागल्यामुळे या धरणातून सोडण्यात आलेले पाणी ही  जायकवाडीत दाखल झाल्याने पाणी पातळीने उच्चांक गाठला. धरणाच्या टक्केवारीने शंभरी गाठली. 

जायकवाडीचे २७ दरवाजे उघडले, पैठण शहराला पुराचा धोका.

sakal_logo
By
चंद्रकांत तारु

पैठण (औरंगाबाद) : येथील जायकवाडी धरणाच्या पाणलोट व मुक्त क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे धरण प्रशासनाने शुक्रवारी (ता.१८) मध्यरात्री धरणाची पातळी पातळी धोक्याच्या स्थितीत गेल्यामुळे धरणाचे वक्राकार एकुण २७ दरवाजे उघडून गोदावरी नदी पात्रात ९४ हजार ३२० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. लाखाचा विसर्ग सुरु झाल्यामुळे पैठण शहरातील नागरिकांत पुराच्या भितीचे वातावरण पसरले आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

यंदाच्या पावसाळ्यात धरणाच्या पाणलोट व मुक्त क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली. एवढेच नव्हे तर या पाण्यामुळे धरणाच्या पाणी पातळीने अर्धशतक पार केले. यानंतर या पावसाचा जोर वाढत राहिल्यामुळे धरणाचा पाणीसाठा ७० टक्के झाला. या दरम्यान नाशिकसह जायकवाडी धरणावरील धरणे ही भरु वाहू लागल्यामुळे या धरणातून सोडण्यात आलेले पाणी ही  जायकवाडीत दाखल झाल्याने पाणी पातळीने उच्चांक गाठला. धरणाच्या टक्केवारीने शंभरी गाठली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शेवटी धरण प्रशासनाला संभाव्य पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जायकवाडीचे सर्व २७ दरवाजे उघडण्याचा निर्णय घेवून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. तहसीलदार चंद्रकांत शेळके, उपविभागीय अधिकारी डॉ.स्वप्नील मोरे, जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, धरण सहायक अभियंता संदीप राठोड, बुध्दभुषण दाभाडे, नगर परिषद नगराध्यक्ष सुरज लोळगे, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी विशेष नियंत्रण ठेवले आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

धरणाच्या पायथ्याखालचा दगडी पुल पाण्यात बुडाला ! 
जायकवाडी धरण निर्मितीच्या काळात धरणाच्या अगदी पाथथ्याशी गोदापात्रातील असणारा दगडी पुल पाण्याखाली गेला आहे. धरणातुन पाणी सोडण्यात आल्यानंतर या पुलाच्या काठा पर्यंत पाणी आले.परंतु पुलावरून पाणी वाहिले नव्हते.  आता धरणाच्या दरवाजातून एक लाखाच्या जवळपास पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने हा दगडी पुल पाण्यात बुडाला आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)
 

go to top