esakal | सावधान! येलदरी धरणाचे दरवाजे केंव्हाही उघडू शकतात, खडकपूर्णातून आवक वाढली
sakal

बोलून बातमी शोधा

parbhani

उर्ध्व भागातील खडकपूर्णा धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने ते पाणी येलदरी धरणात पोहचत आहे

सावधान! येलदरी धरणाचे दरवाजे केंव्हाही उघडू शकतात, खडकपूर्णातून आवक वाढली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जिंतूर (परभणी): परभणी व हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या येलदरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. सध्या धरणात ८८ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे येत्या काही तासांत येलदरी धरणाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात. परिणामी जिल्हा प्रशासनाने पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात असलेल्या येलदरी धरणाच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे धरणातील पाणी पातळी ८८ टक्यापर्यंत वाढली आहे.

उर्ध्व भागातील खडकपूर्णा धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने ते पाणी येलदरी धरणात पोहचत आहे. धरण सुरक्षितता व पुरनियंत्रण लक्षात घेता धरणाचे दरवाजे कधीही उघडले जाऊ शकतात. हे पाणी पूर्णा नदी पात्रात सोडले जाणार आहे. त्यामुळे या नदीवर असलेल्या जिंतूर (जि.परभणी), औंढा व सेनगाव (जि.हिंगोली) या तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. येलदरी धरण पूरनियंत्रण कक्षाच्यावतीने तहसिलदार जिंतूर, सेनगाव व औंढा यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

हेही वाचा: जिल्हा परिषदेतील शाखा अभियंता लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

२सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजात येलदरी धरणाच्या पाणी पातळीची नोंद घेण्यात आली आहे. त्यात सध्या येलदरी धरणात ८८ टक्के पाणीसाठा असल्याचे समजले. सध्या धरणात मृत पाणीसाठा १२४.६७० दशलक्ष घन मीटर आहे. तर जिवंत पाणीसाठा ७११.५९६ दलघमी आहे. सध्या एकूण पाणी साठा ८३६.२७३ दलघमी आहे. सध्या पाण्याची पातळी ४६०.८०० मीटर आहे. मागील २४ तासांत पाण्याची आवक ७.४४४ दलघमी होत आहे. याची टक्केवारी ८७.८७ टक्के झाली आहे. सध्या धरणाच्या विद्युत निर्मिती केंद्रातून पाण्याचा विसर्ग होत नाही. तसेच मुख्य दरवाज्यातूनही पाणी सोडलेले नाही. परंतू पाण्याची आवक पाहत कोणत्याही वेळेला हे पाणी पूर्णा नदी पात्रात सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा: शेतकऱ्याच्या मुलीची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

गतवर्षीही धरणाचे दरवाजे उघडले होते-

गतवर्षी परभणीत जोरदार पाऊस झाला होता. खडकपूर्णा धरणाच्या परिसरातही पावसाचा गतवर्षी जोर चांगला राहिल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे गतवर्षी म्हणजे २०२० च्या सप्टेंबर महिन्यातच येलदरी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. परतू, यंदा हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास आले असून येत्या काही तासांच धरणाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात.

loading image
go to top