परभणी : पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम निश्चित

परभणी : पोलिस बंदोबस्तासाठी अडीच लाखांचा भरणा
Parbhani Municipal Corporation encroachment campaign
Parbhani Municipal Corporation encroachment campaignsakal

परभणी : पोलिस बंदोबस्त न मिळाल्यामुळे महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम अनिश्चित झाली होती. परंतु, आता पोलिस बंदोबस्तासाठी लागणाऱ्या रक्कमेचा पालिकेने भरणा केल्यामुळे ती निश्चित झाली आहे. आता कोणत्याही दिवशी व वेळी सदरील मोहीम सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महानगरपालिकेने शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, पोलिस बंदोबस्त मिळत नसल्यामुळे मोहिमेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. आता सोपस्कर पूर्ण झाले असून, पालिकेने बंदोबस्तासाठी अडीच लाख रुपये भरल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यास अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी देखील दुजोरा दिला आहे.

महापालिकेत गुरुवारी आयुक्त देविदास पवार यांनी अतिक्रमण मोहिमेबाबत आढावा बैठक घेतली. शहरात मनपाच्या जागेवर, नाल्यावरील व मोकळ्या जागेवरील कच्ची, पक्की अतिक्रमणे कोणत्याही क्षणी पाडण्यात येणार आहे. यासाठी पथक प्रमुखांनी आपल्या स्तरावर कडक कारवाई करावी, ज्याच्याकडून कारवाईला विरोध होईल, अशा ठिकाणी साहित्य जप्त करून घ्यावेत, अशा सूचना श्री. पवार यांनी पथकाला दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपायुक्त देविदास जाधव, प्रभाग समित्यांचे सहायक आयुक्त, मुख्य स्वच्छता निरीक्षक यांच्यासह अभियंते, विभाग प्रमुख उपस्थित होते.

या भागात प्रामुख्याने मोहीम

शहरातील वसमत रोड, जिंतूर रोड, गंगाखेड रोड, धार रोड, वांगी रोड, जुना कारेगाव रोड, दर्गा रोड, मुख्य बाजार पेठ, ग्रँडकॉर्नर ते अपना कॉर्नर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, बसस्थानक ते रेल्वेस्थानक रस्ता या भागात प्रामुख्याने अतिक्रमण मोहीम राबवली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com