परभणी महापालिकेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

त्रिशंकु परिस्थिती, शिवसेनेला मतदारांनी नाकारले

परभणीः परभणी महापालिकेत सर्वाधिका 31 जागावर विजय संपादीत करून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 18 जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजप आठ जागावर विजयी झाली आहे तर सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेला केवळ सहा जागेवरच समाधान मानावे लागले. दोन जागा अपक्षाच्या पदरात पडल्या आहेत.

परभणी महापालिकेच्या 65 जागासाठी बुधवारी (ता.19) मतदान घेण्यात आले. मतमोजणीला आज (शुक्रवार) सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. सकाळी 11
वाजता प्रभाग आठचा पहिला निकाल हाती आला. यात सर्वच्या सर्व चार जागा काँग्रेसनेच जिंकत विजयाच खाते उघडले होते. त्यानंतर हळू-हळू एक-एक निकाल हाती येत गेले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सर्व 65 जागांचे निकाल हाती आले. यात काँग्रेस 31, राष्ट्रवादी काँग्रेस 18, भारतीय जनता पक्ष आठ, शिवसेना सहा तर अपक्ष दोन जागेवर विजयी झाले आहेत.

सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस समोर आला असला तरी त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी इतर पक्षाची साथ घ्यावी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 18 जागा मिळाल्या असल्याने सत्तेची चावी राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहू शकते असा अंदाज वर्तविल्या जात आहे.

महापौर, विरोधी पक्षनेत्या पराभुत प्रभाग 15 मधून निवडणुक लढविणाऱ्या महापौर संगीता वडकर (राष्ट्रवादी काँग्रेस) व प्रभाग नऊ मधून निवडणुक लढविणाऱ्या विरोधी पक्षनेत्या अंबिका डहाळे (शिवसेना) यांना पराभवाचा सामाना करावा लागला. प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर यांना पराभव स्विकारावा लागला आहे.

Web Title: parbhani municipal election