परभणी: कर्जाच्या विवंचनेतून शेतकर्‍याची अात्महत्या

विलास शिंदे
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

दत्ता काशिनाथ केकान (वय ४०) या शेतकर्‍याने सततच्या नापिकीमुळे बॅकेचे घेतलेले कर्ज कसे फेडावे अाणि मुला, मुलिच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च पेलवत नसल्याने दत्तनगरातील राहत्या घरातील वाड्यात अाडूला दोरीच्या साह्याने बुधवारी राञीच्या सुमारास गळफास घेवून अात्महत्या केली.

सेलू : सततच्या नापिकीने बँकेचे कर्ज कसे फेडावे व मुला, मुलीचा शिक्षणाचा खर्च कसा करावा. या विवंचनेतून शहरातील दत्तनगरातील एका शेतकर्‍याने राहत्या घरातील वाड्यात अाडूला दोरीच्या साह्याने गळफास घेवून अात्महत्या केल्याची घटना गुरूवारी (ता.२४) रोजी सकाळी उघडकीस अाली. या घटनेची नोंद सेलू पोलिस ठाण्यात झाली.

दत्ता काशिनाथ केकान (वय ४०) या शेतकर्‍याने सततच्या नापिकीमुळे बॅकेचे घेतलेले कर्ज कसे फेडावे अाणि मुला, मुलिच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च पेलवत नसल्याने दत्तनगरातील राहत्या घरातील वाड्यात अाडूला दोरीच्या साह्याने बुधवारी राञीच्या सुमारास गळफास घेवून अात्महत्या केली. केकान यांना तालुक्यातील चिकलठाणा येथे सात एकर जमीन असून त्यांच्याकडे स्टेट बँक अाॅफ इंडिया या बँकेचे कर्ज अाहे.

केकान यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार अाहे. या घटनेने दत्तनगर परिसरात हळहळ व्यक्त होत अाहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक डी. के. चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संजय साळवे हे करित अाहेत.

Web Title: Parbhani news farmer suicide in Selu