परभणी : तीन गाव एक गणपती, 17 वर्षाची परंपरा कायम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

या वर्षीही हि एकाच सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून एकाच गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून सामाजिक बांधिलकीची प्रेरणा कायम ठेवली आहे. सार्वजनिक गणेश उत्सवाच्या काळात एकाच गावात अनेक सार्वजनिक गणेश मंडळ असतात. यातून सलोख्याचे वातावरण राहावे म्हणून पोलिस विभावर ताण निर्माण होतो. यातूनच एक गाव एक गणपती अशी संकल्पना राबवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असते.

गंगाखेड (बातमीदार) : गंगाखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सोनपेठ तालुक्यातील वैतागवाडी, उदंरवाडी, वैतागवाडी तांडा येथील ग्रामस्थांनी तीन गाव एक गणपती हि परंपरा गेल्या 17 वर्षांपासून राबवत आहेत. यातून ग्रामस्थांच्या एकोप्याचा आर्दश दाखवून दिला आहे.

या वर्षीही हि एकाच सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून एकाच गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून सामाजिक बांधिलकीची प्रेरणा कायम ठेवली आहे. सार्वजनिक गणेश उत्सवाच्या काळात एकाच गावात अनेक सार्वजनिक गणेश मंडळ असतात. यातून सलोख्याचे वातावरण राहावे म्हणून पोलिस विभावर ताण निर्माण होतो. यातूनच एक गाव एक गणपती अशी संकल्पना राबवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असते. याही पुढे जाऊन सामाजिक, सांस्कृतिक बाधीलकी जोपासत गेल्या 17 वर्षांपासून उदंरवाडी,
वैतागवाडी, वैतागवाडी तांडा येथील ग्रामस्थानी तीन गाव एक गणपती उत्सवातून सदभावना संदेश आपल्या कार्यातून दिला.

परभणी जिल्ह्य़ातील हे पहिलीच गावे आहेत. त्यांनी गेल्या सतरा वर्षपूर्व तीन गाव एकच गणपतीची परंपरा जोपासत आहे. गणेश उत्सवात रोज सकाळ संध्याकाळ गणेशाची पुजा करून आरती केली जाते.या आरतीच्या वेळी तिन्ही गावचे ग्रामस्थात , महिला, बाल, वृद्ध, युवक, असे सर्ववयोगटाती मंडळी उपस्थित असतात. सकाळ आणि संध्याकाळी भजणी मंडळे भजन गणपती विसर्जनाच्या दिवसा पर्यंत असते. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी तिन्ही गावच्या ग्रामस्थांना महाप्रसादसाठी आमंत्रित करतात. या वर्षासाठी गणेश उत्सव मंडळाची कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. त्यात पांडूरंग वैतागे,बबन गयाळ,प्रल्हाद बचाटे, राजाभाऊ वैतागे, भगवान निळे,भगवान जंबाले, विठ्ठल व्होरे, यशवंत निळे,चिमाची वैतागे, संभाजी वैतागे, शिवाजी राठोड, बळीराम राठोड, दगडोबा भुसनर,दत्तराव करवर, आदि कार्यकर्त्यासह तिन्ही गावचे ग्रामस्थ गणेशोत्सव  पार पाडण्यासाठी कार्य करत आहेत.

Web Title: Parbhani news ganesh festival in village