Parbhani News :मानवी तस्करीचा छडा लावणाऱ्या पोलिसांचा गौरव

केवळ आरोपींना अटकच केली नाही तर पाच बालकांची सुटका करून त्यांना पालकांकडे सुपूर्द ही केले. या उत्कृष्ट कामगिरीची दखल राज्य शासनाने ही घेतली.
parbhani news
parbhani news sakal

परभणी - मानवी तस्करीचा छडा लावून थेट तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यातील हैदराबाद व विजयवाडा येथील आरोपींची टोळी अटक करणाऱ्या जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा रविवारी (ता.२७) शासन आपल्या दारी या कार्यक्रमात कुलगुरु डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.

जिल्ह्यातून छोट्या मुलांना पळवून नेऊन तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यात विक्री केली जात होती. या प्रकरणी परभणीच्या पोलिस अधिक्षक रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष स्थापन करण्यात आला होता. या कक्षाअंतर्गत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छडा लावत रेस्क्यू ऑपरेशन करून अनेक आरोपींना अटक केली.

parbhani news
Parbhani News : शिक्षणासाठी मुलींची पायपीट;दिडशेवर मुली शाळेत जातात चालत

केवळ आरोपींना अटकच केली नाही तर पाच बालकांची सुटका करून त्यांना पालकांकडे सुपूर्द ही केले. या उत्कृष्ट कामगिरीची दखल राज्य शासनाने ही घेतली.

parbhani news
Beed News : जातिवाचक शिवीगाळ, मारहाण व धमक्यांना कंटाळून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

राज्यभरात या प्रकरणाची चर्चा होत होती. या प्रकरणात काम करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण यांच्यासह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या फौजदार राधिका गिरधर भावसार, सहायक पोलिस उपनिरीक्षक शेख शकील शेख अहमद शासन आपल्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत रविवारी गौरविण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com