परभणीत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

परभणी - मुलाने आत्महत्या केल्यानंतर पित्यानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील वांगी रोडलगतच्या सरगम कॉलनीत मंगळवारी सकाळी उघडकीस आली. 

परभणी - मुलाने आत्महत्या केल्यानंतर पित्यानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील वांगी रोडलगतच्या सरगम कॉलनीत मंगळवारी सकाळी उघडकीस आली. 

मरिबा तुकाराम गायकवाड (वय75) आणि चंद्रकांत मरिबा गायकवाड (वय 40) अशी आत्महत्या केलेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत. चंद्रकांत हे जालना येथे राज्य राखीव पोलिस दलात चतुर्थश्रेणी पदावर कार्यरत होते. दोन दिवसांपूर्वी ते येथे आले होते. जालन्याला कामावर जाण्यासाठी आज पहाटे ते उठले होते. जालन्याला जाण्यासाठी तयार झाले; परंतु घरातील एका खोलीत जाऊन त्यांनी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही माहिती शेजारी राहणारे त्यांचे वडील मरिबा यांना समजली. मुलाच्या आत्महत्येमुळे शोकाकुल झालेल्या मरिबा यांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली.

Web Title: parbhani news suicide