परभणीत पेट्रोल नव्वदी पार 

परभणीत पेट्रोल नव्वदी पार 

परभणी - परभणी जिल्ह्यात पेट्रोल दरवाढीने ऐतिहासिक उच्चांक गाठत मंगळवारी नव्वदी पार केली. ग्राहकांना प्रति लिटर 90.29 रुपयांच्या दराने पेट्रोल खरेदी करावे लागले. 

ज्याप्रमाणे इंधनाचे दर नियंत्रणमुक्त आहेत, त्याप्रमाणे परभणीतील पेट्रोलवाढीवर प्रशासनाचे नियंत्रण नाही. मागील पंधरवड्यापासून सातत्याने दरात वाढ पाहावयास मिळाली. सोमवारी (ता. 10) पेट्रोल 89.97 रुपये होते, तर डिझेल 77.93 रुपये प्रति लिटर होते. इंधनदरवाढीविरोधी पक्षांकडून काल "बंद' आंदोलन केले होते. त्यानंतर लगेचच आज परभणीत पेट्रोलने दराचा उच्चांक गाठला. तूर्तास देशात सर्वाधिक महाग पेट्रोल जिल्ह्यात असून, दरात दिवसेंदिवस वाढच होत आहे. चार वर्षांपूर्वी कच्च्या तेलाचे जे दर होते, तेच आजही आहेत. परंतु परभणीपासून तेल डोपोचे अंतर लांब असल्याचे कारण दरवाढीसाठी दिले जात आहे. दुसरीकडे वाहतूक खर्चासह राज्य सरकारचा कर आणि "व्हॅट'चा बोजाही ग्राहकांवर टाकण्यात आला. 

दरवाढीची कारणे 
मराठवाड्यात तेल डेपो नाहीत. म्हणून जिल्ह्यातील पंपचालकांना विदर्भातील अकोला किंवा सोलापूर, मनमाड येथून पेट्रोल व डिझेल आणावे लागते. त्याचा वाहतूक खर्च पंपचालक दरामधून वसूल करतात. त्याहीपेक्षा इंधनावर जवळपास 35 टक्‍के "व्हॅट' आहे. असे असताना पेट्रोलवर "जीसएसटी' लावण्यास तयार नाही. म्हणून प्रति लिटरमागे 20 रुपयांनी इंधन महाग पडते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com