Parbhani : नगरसेवक सचिन देशमुखांची काँग्रेसला सोडचिठ्ठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin Deshmukh
Parbhani : नगरसेवक सचिन देशमुखांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

Parbhani : नगरसेवक सचिन देशमुखांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : महापालिकेद्वारे (Parbhani Municipal Corporation) लोकहिताची कामे होणे अपेक्षित आहे. परंतु महापालिकेत तसे होतांना दिसत नाही. सत्तेत असणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांकडून हुकूमशाही सुरु आहे. हुकमशाही सत्तेतील व्यवस्था शोषण करणारी असून ती लोकहितवादी निश्चितच नाही, असा गंभीर आरोप करत आपण काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याची माहिती सत्ताधारी काँग्रेसचे (Congress Party) नगरसेवक सचिन देशमुख यांनी मंगळवारी (ता.१६) पत्रकार परिषदेत दिली. परभणी शहरातील प्रभाग पाचमधील काँग्रेसचे नगरसेवक सचिन देशमुख हे २०१२ पासून महापालिका राजकारणात सक्रिय आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील सचिन देशमुख (Corporator Sachin Deshmukh) यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केली असली तरी काँग्रेसच्या स्थानिक नेते मंडळींवर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काही काळ ते महापालिकेच्या आरोग्य सभापतीपदी देखील कार्यरत होते. आरोग्य सभापतीपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या लोकहितवादी निर्णयाची त्यांनी माहिती दिली. परंतू, २०१७ पासून महापालिकेत काँग्रेसची सत्ता असतांनाही आपण मांडलेल्या लोकहितवादी ठरावांना सातत्याने विरोध करणे, सूचनांकडे दुर्लक्ष करणे इतकेच काय तर आपल्या प्रभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही काम करण्यास मज्जाव करून त्रास दिला जात (Parbhani) असल्याचे ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा: प्रोटोकाॅल बाजूला ठेवून केंद्रीय मंत्री कराडांनी प्रवाशावर केले उपचार

गेल्या पाच वर्षापासून माझे सातत्याने खच्चीकरण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मला पक्षाचा कोणताही त्रास नसल्याचे सांगत त्यांनी केवळ पक्षाच्या जिल्ह्यातील श्रेष्ठींवर त्यांनी नाव न घेता हल्ला चढविला. ते म्हणाले महापालिकेत विरोधी पक्ष सक्षमपणे कार्यरत नाही. त्यामुळे चुकीच्या कामाला विरोध केला जात नाही, ही शोकांतिका आहे. माझ्यासारखा नगरसेवक विरोध करतो तर एकटे पाडले जाते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विचारांशी माझे विचार जुळत नाही. मला लोकहितवादी कामे करायाची आहेत. त्यामुळे मी आता कंटाळून काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष नदीम ईनामदार यांच्याकडे मी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचेही ते म्हणाले. आपण कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही. परंतू, आपण वाॅर्डातील मतदार, मित्र व हितचिंतकांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे सचिन देशमुख यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top