परभणी: 'प्रहार जनशक्ती'चे चिखलात लोटांगण

प्रहार जनशक्ती पक्षाने शुक्रवारी (ता.१७) कारेगाव रस्त्यावरील मोठा मारोती ते औद्योगिक वसाहतीपर्यंतच्या रस्त्याच्या मागणीसाठी लोटांगण आंदोलन केले.
परभणी: 'प्रहार जनशक्ती'चे चिखलात लोटांगण
sakal

परभणी: प्रहार जनशक्ती पक्षाने शुक्रवारी (ता.१७) कारेगाव रस्त्यावरील मोठा मारोती ते औद्योगिक वसाहतीपर्यंतच्या रस्त्याच्या मागणीसाठी लोटांगण आंदोलन केले. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः चिखलात लोटांगण घालून रस्त्यावरील चिखलपाण्यात ठिय्या घेऊन महापालिकेचे लक्ष वेधले.

परभणी: 'प्रहार जनशक्ती'चे चिखलात लोटांगण
शासकीय वैद्यकीय महाविद्यालाची घोषणा; परभणीकरांचा संघर्ष आला फळाला...!

प्रहार जनशक्ती पक्षाने जुना कारेगाव रोडवरील मोठा मारोती, गणपती चौक, उघडा महादेव मंदिर ते औद्योगीक वसाहतीपर्यंतचा रस्ता व नाल्यांच्या मागणीसाठी या लोटांगण आंदोलनाचा इशारा दिला होता. या रस्त्यासह दोन्ही बाजूच्या नाल्या अनेक वर्षापासून नुतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. हा संपूर्ण रस्ता खड्ड्यात गेल्यामुळे रस्त्यावरून चालता देखील येत नाही.

नाल्या नसल्यामुळे रस्त्यावरच पाणी साचून राहते. त्यामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. या रस्त्याची दुरावस्था दुर करावी, नाली बांधकाम करावे, या मागणीसाठी प्रहारने उघडा महादेव मंदिरासमोर व औद्योगीक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यातील चिखलात बसून आंदोलन केले.

या आंदोलनात प्रहारचे तालुका चिटणिस गोविंद गिरी यांच्यासह रोहिदास बोबडे , ओंकार गव्हाणे , प्रभाकर जगाडे, अॅड. लक्ष्मण काळे , संदिप सोळंके, बालाजी गिरी, शाहु गवारे , दिव्यांग सेलचे सुनील मुलगीर , स्वछता दूत कावळे, पिंटू कदम, सुधीर झाडे, अमोल भिसाड आदींसह मोठ्या संख्येने कार्यकत्यांची, परिसरातील नागरीकांची उपस्थिती होती. नगरसेवक सचिन देशमुख यांची देखील यावेळी उपस्थिती होती.

प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनासाठी निमंत्रण दिले होते. नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता, म्हणून आपण त्यामध्ये सहभागी झालो होतो. पालिका प्रशासनाने तात्काळ रस्त्याची, डागडुजीची कामे हाती घेणे गरजेचे आहे. - सचिन देशमुख, नगरसेवक, प्रभाग क्रमांक पाच, मनपा परभणी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com