परभणी : कचऱ्यापासून कंपोस्ट खत व पेव्हर ब्लॉक निर्मिती

प्रा. किशन बारहाते 
Monday, 28 December 2020

मानवत नगरपरिषदेच्या घनकचरा प्रकल्प,कचऱ्यापासून मिळणार उत्पन्न

मानवत (जिल्हा परभणी) : मानवत नगरपरिषदेने घनकचरा प्रकल्पाचे आधुनिकीकरण केले आहे. या प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया करून महिन्याकाठी १०० टन कंपोस्ट खताची व पेव्हर ब्लॉकची निर्मिती केली जात आहे.प्रशासनाच्या या उपक्रमशील उपक्रमामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्या बरोबरच उत्पन्नाचे स्त्रोत प्राप्त झाले आहेत. प्रशासनाचा हा उपक्रम राज्यातील अन्य नगरपरिषद प्रशासनाला मार्गदर्शक ठरावा असा आहे..

४० हजार लोकसंख्येच्या मानवत शहरांत एकूण ९ प्रभाग आहेत.शहरांच्या वाढत्या विस्तारामुळे व व्यापारी करणामुळे कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे पालिकेसमोर आव्हान उभे टाकले होते.पालिकेच्या ९ घंटागाडीद्वारे हा कचरा गोळा करण्यात येतो.हा कचरा पालिकेच्या घनकचरा प्रकल्पावर नेला जातो. या कचऱ्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खताची निर्मिती केली जाते.महिन्याकाठी १८० टन कचऱ्यापासून ११० टन कंपोस्ट खत निर्माण केला जातो.आहे.दुसरीकडे सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने आधुनिक यंत्रसामग्री खरेदी केली आहे. शहरात दररोज गोळा होणाऱ्या तीन टन सुक्या कचऱ्यावर रिसायकलिंग केली जात आहे. सुका कचरा  गोळा करून तो वेगवेगळा करून साठवण्यासाठी पालिकेने एमआरएफ सेंटरची उभारणी केली आहे. तसेच शहरात गोळा होणारे प्लास्टिक पासून पेवर ब्लॉक तयार करण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. घातक कचरा गोळा केल्यानंतर दररोज त्याची विल्हेवाट लावली जात आहे. यासाठी घनकचरा प्रकल्पावर दहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालिका  शहरात गोळा होणाऱ्या कचऱ्याचे विल्हेवाट लावण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्यामुळे शहराची कचरामुक्त शहराकडे वाटचाल सुरू झाली आहे.

हेही वाचानांदेड : पुणे जागर प्रकल्पातील सदस्यांनी साधला अर्धापूरातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाशी संवाद -

सर्व सुविधायुक्त घनकचरा प्रकल्प

मानवत शिवारात सर्वे नंबर २०८ मध्ये पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे. याठिकाणी पालिकेने प्रकल्पभोवती संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. याठिकाणी पाण्याची आणि पूर्ण वेळ विज व्यवस्था करण्यात आली आहे. कचरा संकलित करणाऱ्या घंटा गाड्यांतील वजन करण्याकरिता वजन काटा बसवण्यात आला आहे. याठिकाणी कर्मचाऱ्यांनी बाग तयार केली असून या बागेत विविध झाडे लावण्यात आली आहेत. नियुक्त कर्मचारी प्रकल्पातील स्वच्छतेची काळजी घेत असून घनकचरा प्रकल्पाला उद्यानाचे स्वरूप आले आहे.

" नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या कडून घंटागाडीत टाकावा.नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत प्रशासनाला सहकार्य करावे "  
- डॉ .अंकुश लाड, युवा नेते मानवत

संपादन- प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: Production of compost manure and paver blocks from waste parbhani news