esakal | सर्वदूर जोरदार पाऊस, परभणीत जिल्ह्यातील शेतकरी सुखावला
sakal

बोलून बातमी शोधा

परभणीत जोरदार पाऊस

सर्वदूर जोरदार पाऊस, परभणीत जिल्ह्यातील शेतकरी सुखावला

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : शहरासह Parbhani जिल्ह्यात रविवारी (ता.११) दुपारपासून सायंकाळ सातपर्यंत जोरदार पाऊस Rain झाला. सायंकाळी जोरदार वारे ही सुटल्याने संपूर्ण शहरात दाणादाण उडली होती. जिल्ह्यातील खरीप पिकांकरिता पाऊस गरजेचा होता. शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले होते. आता पाऊस सक्रिय झाला. त्यामुळेच शेतकरी सुखावला आहे. रविवारी सकाळी सर्वदूर रिमझिम पाऊस होता. दुपारपासून पावसाने जोरदार सलामी दिली. काही वेळ अक्षरश: मुसळधार पाऊस झाला. दुपारी अडीचपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत जोरदार पाऊस सुरूच होता. या पावसाने मध्यवस्तीतील सखल भागातील रस्ते पूर्णतः जलमय झाले आहेत. गुजरी बाजार, गांधी पार्क, क्रांती चौक, नारायण चाळ कॉनर्र या ठिकाणी रस्त्यारस्त्यावर पाणी वाहत होते. अन्यत्र सुद्धा वसाहती व झोपडपट्टी भागातील सखल भाग जलमय झाला. काही घराघरात पाणी घुसले. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. यातच काही भागातील वीजपुरवठा दुपारपासून खंडीत झाला. सायंकाळी उशिरापर्यंत तो वीजपुरवठा सुरळीत झालाच नाही. जिल्ह्यात मानवत, पूर्णा, पालम, गंगाखेड व अन्यत्र जोरदार पाऊस सुरूच होता. छोट्या-मोठ्या ओढ्या, नाल्यांना या पावसाने पूर आला. नाले तुडूंब भरून वाहत होते. पावसाने काही भागातील रस्ते सुद्धा वाहतुकीसाठी ठप्प झाले. parbhani rain updates heavy rain in district

हेही वाचा: परभणीसह परिसरात जमिनीतून गूढ आवाज

मुद्गगल बंधाऱ्यातून पाणी सोडणार

पाथरी तालुक्यातील मुद्गल येथील उच्च बंधाऱ्यातून कोणत्याही क्षणी गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडले जाईल, असा इशारा पूरनियंत्रण अधिकाऱ्यांनी रविवारी रात्री दिला आहे. मुद्गल उच्च बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी सायंकाळपर्यंत संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. रविवारी सायंकाळी या बंधाऱ्यात ९०.१४ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला होता. त्यामुळे या बंधाऱ्यात आणखीन पाणी उपलब्ध झाल्यास पाटबंधारे विभागाद्वारे कोणत्याही क्षणी बंधार्‍याचे दरवाजे उघडून गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडले जाणार आहे. दरम्यान, या बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावातील ग्रामस्थांनी मालमत्तेचे जीविताची पशुधनाची अन्य साहित्य इतर कोणतीही हानी होणार नाही. या संदर्भात सर्वतोपरी खबरदारी घ्यावी, अशा सूचना पूरनियंत्रण अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

loading image