Parbhani | परभणीतील तीन तालुक्यात अतिवृष्टी, चौथ्या दिवशीही संततधार

पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Parbhani Rain News
Parbhani Rain Newsesakal

परभणी : गेल्या चार दिवसांपासून परभणी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी (ता.१३) सकाळी साडेदहा वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ५७.८ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. त्यात गंगाखेड, पूर्णा, पालम या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. उर्वरित सहा तालुक्यातही पावसाचे प्रमाण अधिक आहे. पावसामुळे पूर्णा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. परभणी (Parbhani) जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. सतत पाऊस कोसळत असल्याने नदी-नाले भरून वाहत आहेत. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील सर्वच नऊ तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. (Parbhani Rain Updates Heavy Showers In Three Taluka Of District)

Parbhani Rain News
हिंगोली जिल्ह्यात एकोणवीस मंडळात अतिवृष्टी ; कयाधु, आसना नदीला पुर

सर्वाधिक पाऊस (Rain) हा पूर्णा तालुक्यात झाला आहे. या तालुक्यात तब्बल ९५.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या तालुक्यातील आहेरवाडी, वडगाव, फुकटगाव, सोनखेड या चार गावांचा संपर्क तुटला आहे. मागील २४ तासांत तालुक्यातील सर्वच मंडळात अतिवृष्टी झाली आहे. पूर्णा-नांदेड हा मार्ग बंद झाला आहे. पोखर्णी नजीकच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग पहाटेपासून बंद आहे. तर पूर्णा-झिरो फाटा रस्त्यावरील माटेगाव येथील थुना नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतुक ही बंद झाली आहे. गंगाखेड-परळी हा राज्य रस्ता सकाळी साडेअकरा वाजता बंद झाला आहे. या मार्गावरील शिवाजीनगर तांडा येथील पुलाचे काम सुरु असल्याने तो मार्ग चिखलमय झाल्याने तो सकाळी साडेअकरा वाजल्यापासून बंद झालेला आहे. पालम तालुक्यात गळाठी व लेंडी नदीला पुर आल्याने जवळपास २० गावांचा पालमशी संपर्क तुटला आहे.

Parbhani Rain News
शहनाज गिलने ग्रामस्थांना मदत करत घेतला निसर्गाचा आनंद

तीन तालुक्यात अतिवृष्टी

जिल्ह्यातील परभणी तालुक्यात ५६.२, गंगाखेड तालुक्यात ६५.५, पाथरी तालुक्यात ४२.५, जिंतूर तालुक्यात ४९.५, पूर्णा तालुक्यात९५.१, पालम तालुक्यात८०.५, सेलू तालुक्यात ४३.१, सोनपेठ तालुक्यात ४३.२ तर मानवत तालुक्यात ४०.८ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com