esakal | परभणीत २१.४ मिलीमिटर पावसाची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

परभणीत २१.४ मिलीमिटर पावसाची नोंद

रविवारी (ता.१३) सकाळी १० वाजता संपलेल्या २४ तासात जिल्हयात २१.४ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.

परभणीत २१.४ मिलीमिटर पावसाची नोंद

sakal_logo
By
​गणेश पांडे

परभणी : मृग नक्षत्रानंतर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. दररोज कमी अधिक प्रमाणात पावसाचे आगमन होत आहे. रविवारी (ता.१३) सकाळी १० वाजता संपलेल्या २४ तासात जिल्हयात २१.४ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस हा सेलू तालुक्यात झाला असून या तालुक्यातील देऊळगाव ९२.५ तर सेलू मंडळात ७० मिलीमिटर पाऊस झाला आहे. (Parbhani received 21.4 mm of rainfall)

हेही वाचा: परभणी शहरात विकेण्ड लॉकडाऊनचा सकाळच्या सत्रात फज्जा

परभणी जिल्ह्यात पावसाने सुरुवातीपासूनच दमदार हजेरी लावलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. जवळपास सर्वच तालुक्यात पेरणीची तयारी सुरु झाली आहे. (ता. १३) व १४ जून रोजी परभणीसह हिंगोली व नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. शनिवारी (ता.१२) रात्री २ वाजल्यानंतर परभणी शहरात जोरदार पावसाचे आगमन झाले. सुरुवातीला वादळी वाऱ्यासह पावसास सुरुवात झाली. त्यानंतर पहाटे साडेतीन वाजेपर्यंत पाऊस सुरुच होता. हा पाऊस जवळपास सर्वच तालुक्यात झाला आहे. त्यामुळे शेतीकामाने वेग घेतला आहे. रविवारी सकाळपासून थोडेसे ऊन होते, परंतू नंतर आकाशात ढग जमा झाले. दिवसभर उकाडा जाणवत होता.

हेही वाचा: परभणी शहरात 'आरटीपीसीआर' टेस्टमुळे अनेकांची लसीकरणाकडे पाठ

महसूल मंडळ निहाय आकडेवारी

सेलू तालुका ः वालूर (३४.०), कुपटा (२३.८), चिकलठाणा (५३.३), परभणी तालुका ः परभणी (२९.०), पेडगाव (११.८), जांब (१९.०), झरी (१३.५), सिंगणापूर (१३.५), दैठणा (२१.३), पिंगळी (१३.५), गंगाखेड तालुका ः गंगाखेड (२.८), महातपुरी (१०.५), माखणी (३.८), राणीसावरगाव (४.८), पिंपळदरी (३.८), पाथरी तालुका ः पाथरी (२४.८), बाभळगाव (२७.८), कासापुरी (४९.३), जिंतूर तालुका ः जिंतूर (५६.५), सावंगी (२४.३), बामणी (१४.५), बोरी (२५.८), आडगाव (१९.८), चारठाणा (२७.८), दुधगाव (२८.३), पूर्णा तालुका ः पूर्णा (३.०), ताडकळस (४.८), लिमला (३.१), कात्नेश्वरकर (६.०), चुडावा (०.८), कावलगाव (०.८), पालम तालुका ः पालम (२.३), चाटोरी (२.३), बनवस (७.३), पेठशिवणी (४.१), रावराजुर (४.५), सोनपेठ तालुका ः सोनपेठ (१७.८), आवलगाव (११.८), शेळगाव (२६.८), वडगाव (१३.०), मानवत तालुका ः मानवत (२६.८), केकरजवळा (२४.०), कोल्हा (२१.३), ताडबोरगाव (२०.३), रामपुरी (१०.८)

हेही वाचा: परभणी : लसीकरणाची पुरवठ्याअभावी कासवगतीने वाटचाल

चार महसूल मंडळात अतिवृष्टी

जिल्ह्यातील चार महसूल मंडळात अतिवृष्ठी झाली आहे. त्यामध्ये सेलू तालुक्यातील सेलू (७०.०), देऊळगाव (९२.५), पाथरी तालुक्यातील हादगाव (८६.०) तर जिंतूर तालुक्यातील वाघी धानोरा (७५.८) या चार महसूल मंडळाचा समावेश आहे.

हेही वाचा: परभणी : गुटख्यासह दोन लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त; चारठाणा पोलिसांची कारवाई

असा झाला तालुकानिहाय पाऊस

अ.क्र. तालुका आकडेवारी

१. परभणी १३.५ (मिलीमिटर)

२. गंगाखेड ५.१

३. पाथरी ४७.०

४. जिंतूर ३४.१

५. पूर्णा ३.१

६. पालम ४.१

७. सेलू ५४.७

८. सोनपेठ १७.४

९. मानवत २०.६

-------------------------------------------------

२१.४ (मिलीमिटर)

(Parbhani received 21.4 mm of rainfall)

loading image
go to top