Parbhani : सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक ; मातब्बरांची वाढली धाकधूक

सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले
सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती
सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती esakal

सेलू : सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले. आता महाविकास आघाडी व भाजपचे पदाधिकारी, उमेदवार, कार्यकर्ते यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी रान उठवले आहे. मात्र, या निवडणुकीसाठी मातब्बरांची धाकधूक वाढली आहे.

अर्ज परत घेण्यासाठी पाच दिवस शिल्लक असताना प्रचार शिगेला पोचला असल्याचे चित्र आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून दरवर्षी तालुक्यातील खासगी व्यापारी सीसीआयकडून मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी होते. जिल्ह्यासह इतर ठिकाणाहून कापूस शेतकरी आणतात; तसेच शहरासह तालुक्यात कापूस प्रेसिंग जिनिंग, कापसावरील प्रक्रिया उद्योग आहेत. त्यामुळे बाजार समितीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष ताकद लावत आहेत. तब्बल सात वर्षांनंतर बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे.

निवडणूक लढत भाजप व महाविकास आघाडीत होणार असली तरी अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. पॅनलकडून तगड्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आले. काही निवडणुकींचा अनुभव पाहता पॅनल प्रमुखांकडून धनिकांनाच पॅनलमध्ये घेण्यावर भर देण्यात आला आहे. राजकीय समीकरणे पाहता ही निवडणूक तालुक्यातील महत्त्वाच्या नेत्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे.

१८ संचालकांसाठी ११९ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. उमेदवारी अर्ज परत घेण्याची ता. २० एप्रिल ही शेवटची मुदत असल्याने त्यानंतर पॅनलचा नेमका कोण उमेदवार? हे स्पष्ट होणार आहे.

असे आहेत मतदार

विविध कार्यकारी सहकारी सेवा मतदार संघात सर्वाधिक ११ जागा आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातील चार जागांवर डोळा आहे. सोसायटी मतदार संघात ६२७ मतदार, ग्रामपंचायतीमध्ये ६२७, व्यापारी १८७, तर हमाल, मापाडी संघात ५७३ असे एकूण २ हजार ४२ मतदार आहेत. ता. २८ एप्रिलला मतदान होणार असून, ता. २५ एप्रिलला निकाल जाहीर होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com