परभणीमुळेच मिळाले ‘धनुष्यबाण’ चिन्ह!

शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठविण्याचा निर्णय परभणीकरांसाठी निश्चितच सर्वाधिक धक्कादायक
Shiv Sena Symbol
Shiv Sena Symbol

परभणी : शिवसेनेला ३३ वर्षांपूर्वी परभणी जिल्ह्यामुळेच धनुष्यबाण चिन्ह मिळाले होते. तेव्हापासूनच जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेना, धनुष्यबाण व परभणीतील नागरिकांचे अतूट नाते आजही अबाधित आहे. या काळात लोकसभा असो वा विधानसभा या ठिकाणी केवळ धनुष्यबाणांचीच चलती पाहायला मिळाली. परंतु, निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरूपात का होईना शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठविण्याचा निर्णय परभणीकरांसाठी निश्चितच सर्वाधिक धक्कादायक मानला जात आहे.

मधील काळात परभणीतून शिवसेना सोडून जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात झाले होते. त्यात माजी खासदार प्रा. अशोक देशमुख, अॅड. तुकाराम रेंगे पाटील, अॅड. सुरेश जाधव, माजी आमदार हरिभाऊ लहाने आदींचा समावेश होता. शिवसेनेतून गेलेल्या लोकप्रतिनिधींना घरी पाठविण्याची धमकही परभणीकरांनी शिवसेनेच्या प्रेमापोटी दाखवून दिली आहे.

असा मिळाला धनुष्यबाण

औरंगाबाद महापालिकेच्या १७ एप्रिल १९८८ रोजी झालेल्या पहिल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार धनुष्यबाणावरच लढले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर झालेली सभा राज्यभर गाजली होती. या निवडणुकीत शिवसेनेने आपले प्रभुत्व सिद्ध केल्यामुळे मराठवाड्यात शिवसेनेचा वेगाने प्रसार झाला. दरम्यानच्या काळात १९८९ मध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली.

तेव्हा भाजपसोबत झालेल्या युतीच्या चर्चेत परभणीची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली. प्रा. अशोक देशमुख यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. तोपर्यंत शिवसेनेला आयोगाकडून अधिकृत राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली नव्हती. शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून प्रा. अशोक देशमुख अपक्ष रिंगणात उतरले. त्यांनी धनुष्यबाण हे चिन्ह घेतले. ते ६६ हजारांवर मतांनी विजयी झाले. त्यानंतरच्या निवडणुकांसाठी आयोगाने शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह बहाल केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com