परभणी : अवैध धंद्यांना ‘एसपी’च कारणीभूत;आ. रत्नाकर गुट्टे

जिल्ह्यात अवैध धंदे बोकाळले असून, त्याला पोलिस अधिक्षक कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.
आ. रत्नाकर गुट्टे
आ. रत्नाकर गुट्टे sakal

परभणी : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे बोकाळले आहेत. या अवैध धंद्यांना जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी खतपाणी घालत असून, खुद्द पोलिस अधिक्षकच या अवैध धंद्यांना कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी शनिवारी (ता. तीन) पत्रकार परिषदेत केला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गंगाखेड ठाण्यातर्फे ता. २९ ऑगस्ट रोजी संत जनाबाई कॉलेज येथे शांतता समितीच्या बैठक घेण्यात आली. दरम्यान, आमदार रत्नाकर गुट्टे यांनी भाषण करताना पोलिसांना उद्देशून ‘तुम्ही आमच्यासमोर हप्ते घेता,’ असे वक्तव्य केले होते. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. नंतर गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नंतर आमदार रत्नाकर गुट्टे यांनी परभणीत पत्रकार परिषद घेत परत पोलिसांना लक्ष केले आहे. जिल्ह्यात अवैध धंदे बोकाळले असून, त्याला पोलिस अधिक्षक कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

गेल्या दीड- दोन वर्षांपासून मी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर राज्य शासनास पत्र देत आहे. परंतु, मागील महाविकास आघाडी सरकारे यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्या सरकारवर माझा विश्वास नव्हता. मात्र, आता आमचे सरकार आले आहे. पोलिसांच्या दंडेलशाही विरोधात मी वरिष्ठांकडे तक्रार दिली आहे. त्यावर निश्चित चौकशी होऊन कारवाई होईल, असेही ते म्हणाले. यावेळी गणेशराव रोकडे, सचिन देशमुख आदींची उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com