परभणी पुन्हा तापली, पारा ४४.०१ अंशांवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

तापमान ४५ अंशांवर जाणार
तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून ता. २७ पर्यंत परभणीचे तापमान ४५ अंशांवर जाईल, असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण मौसम सेवा विभागाच्या सल्लापत्रिकेत दिला आहे. किमान तापमानातही वाढ होणार असल्याचे दाखवले आहे. किमान तापमान २५ ते २९ अंशांदरम्यान राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आंबा पिकाला गळती लागू नये म्हणून पिकास सकाळी किंवा सायंकाळी पाणी द्यावे.

परभणी - परभणीत उष्णतेची लाट पुन्हा सक्रिय झाली असून, बुधवारी (ता. २४) पारा ४४.०१ अंशांवर पोचल्याने उष्णतेचा कहर सुरू झाला आहे. यंदाचे आतापर्यंतचे हे सर्वोच्च तापमान आहे. तसेच नांदेड ४३.२९, हिंगोली ३९ अंशांवर तापमान होते. 

दर उन्हाळ्यात परभणी जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण होते. यंदा मार्चपासून लाट सुरू झालेली आहे. सध्या भरदुपारी अंग भाजणारा सूर्यप्रकाश पडत आहे. वाढत्या उन्हामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. मध्यंतरी चार दिवस ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे तापमानात घट झाली होती. त्यानंतर पुन्हा तापमान वाढण्यास सुरवात झाली आहे. 

सकाळी दहापासून उन्हाचा तडाखा सुरू होत आहे. बुधवारी पारा चांगलाच तडकला होता. ४४.०१ अंश तापमानाची नोंद झाली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत उन्हाच्या झळा बसत होत्या. यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे.

तापमान ४५ अंशांवर जाणार
तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून ता. २७ पर्यंत परभणीचे तापमान ४५ अंशांवर जाईल, असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण मौसम सेवा विभागाच्या सल्लापत्रिकेत दिला आहे. किमान तापमानातही वाढ होणार असल्याचे दाखवले आहे. किमान तापमान २५ ते २९ अंशांदरम्यान राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आंबा पिकाला गळती लागू नये म्हणून पिकास सकाळी किंवा सायंकाळी पाणी द्यावे.

भाजीपाला पिकास सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. फुलपिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. रेशीम कीटक संगोपनगृहात तापमान २२ ते २९ अंश व आर्द्रता ८० ते ८५ टक्के राहील याची दक्षता घ्यावी. पशुधनाच्या शेडच्या पत्र्यास पांढरा रंग द्यावा, तसेच गवत, पाचटाचे आच्छादन केल्यास तापमान नियंत्रणात राहील. पाचटावर पाणी टाकावे, असा सल्लाही या पत्रिकेत दिला आहे.

Web Title: Parbhani Summer Temperature Heat