परभणीवर सुर्य कोपला; तापमान 45 अंशावर

कैलास चव्हाण
गुरुवार, 25 एप्रिल 2019

परभणी : परभणीत उष्णतेच्या लाटेने कहर केला असून गुरुवारी (ता.25) यंदाच्या आतापर्यंतच्या तापमानाचा उच्चांक गाठला गेला आहे.आग ओकणारे सुर्यप्रकाशाने परभणीकर हैरान झाले असून गुरुवारी पारा तब्बल 45 अंशावर पोचला आहे.

परभणी : परभणीत उष्णतेच्या लाटेने कहर केला असून गुरुवारी (ता.25) यंदाच्या आतापर्यंतच्या तापमानाचा उच्चांक गाठला गेला आहे. आग ओकणाऱ्या सुर्यप्रकाशाने परभणीकर हैरान झाले असून गुरुवारी पारा तब्बल 45 अंशावर पोचला आहे.

मार्च महिण्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून परभणी तापली आहे. अख्खा मार्च महिणाभर तापमान 40 अंशाच्या पुढे राहिले होते .एप्रिल महिण्याच्या सुरुवातीला पारा 41 अंशाच्या पुढे गेला होता. मध्यंतरी चार दिवस ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे तापमान काहीसे घसरले होते.व परंतु पुन्हा मागील आठवड्यापपासून पारा वाढला आहे. गुरुवारी येथील भारतीय हवामान खात्याच्या केंद्रात 45 अंश तापमानाची नोंद झाली आहे

दररोज सकाळी 10 वाजल्यापासून उन्हाचे चटके सुरु होत आहेत. भर दुपारी भयंकर उन्हाचा कडाका राहत असून  जाळ फेकल्यासारखी स्थिती निर्माण होत आहे. भर उन्हात सावली बाहेर पडणे कठीण झाले असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत उन्हाच्या झळा बसत आहेत. उन्हाच्या तिव्रतेचा जनजिवणावर मोठा परिणाम झाला असून दुपारच्यावेळी रस्त्यावर शुकशुकाट जाणवत आहे. बाजारपेठेतह सायंकाळीच गर्दी होत आहे. माणसाप्रमाणे जनावरांचे देखील उन्हामुळे हाल होताना दिसुन येत आहे. दरवर्षी मे महिण्यात परभणीचे तापमान 45 ते 46 अंशावर जाते. यंदा एप्रील महिण्यातच वैशाख वनवा पेटल्याने मे महिण्यातील स्थिती गंभीर होण्याची चिन्हे 
आहेत.

 

Web Title: Parbhani Temperature Reached is 45 degrees