परभणी : कोरोनाच्या संकटातही थॅलेसिमिया रुग्णांना जीवदान, थॅलेसिमिया सपोर्ट ग्रुपची कौतुकास्पद कामगिरी

गणेश पांडे
Thursday, 31 December 2020

मिशन 2020 थालसेमिया मुक्त परभणी जिल्हा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन थॅलेसिमिया सपोर्ट ग्रुपने वर्षभर कामाचे नियोजन करून ठेवले होते. परंतू मार्च महिण्यापासून अचानकपणे झालेल्या कोरोना संसर्गामुळे या नियोजनात मोठा अडथळा निर्माण झाला होता.

परभणी ः सरत्या वर्षात थॅलेसिमिया सपोर्ट ग्रुपच्यावतीने जिल्ह्यात उल्लेखनीय काम केले आहे. कोरोनासारख्या महामारीमुळे आलेल्या अडचणीवर मात करीत थॅलेसिमियाग्रस्तासाठी रक्तसंक्रमनाचे परिपूर्ण नियोजन करून या रुग्णांचे जीव वाचविले आहेत अशी माहिती थॅलेसिमिया सपोर्ट
ग्रुपचे लक्ष्मीकांत पिंपळगावर यांनी बुधवारी (ता. 30) दिली.

मिशन 2020 थालसेमिया मुक्त परभणी जिल्हा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन थॅलेसिमिया सपोर्ट ग्रुपने वर्षभर कामाचे नियोजन करून ठेवले होते. परंतू मार्च महिण्यापासून अचानकपणे झालेल्या कोरोना संसर्गामुळे या नियोजनात मोठा अडथळा निर्माण झाला होता.  दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले. परंतू थॅलेसिमियाग्रस्त बालकांना जीवन जगण्यासाठी नियमितपणे लागणाऱ्या रक्ताची गरज भागविणे हे मोठे आव्हान सपोर्ट ग्रुप समोर होते असे श्री. पिंपळगावकर म्हणाले.

हेही वाचापरभणी : पारंपरिक पिकांना फाटा देत पपई लागवडतून दोन लाखाचे उत्पन्न

कोरोना संसर्गाच्या काळातही सपोर्टग्रुपचे काम

दर पंधरा दिवसांनी रक्तसंक्रमनाकरीता जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली. ही बाब लक्षात घेऊन थॅलेसिमिया सपोर्ट ग्रुपने जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनात समन्वय साधून ग्रामिण रुग्णालयात व उप जिल्हा रुग्णालयात रक्तसंक्रमन सुविधा उपलब्ध करून घेतली. परिणामी एकाही थॅलेसिमियाग्रस्त बालकांला कोरोनाची लागण झाली नाही हे थॅलेसिमिया सपोर्ट ग्रुपचे यश आहे.महाराष्ट्र मध्ये पहिल्यांदा अशी सुविधा थालसेमिया सपोर्ट ग्रुपच्या पुढाकाराने करण्यात आली.

आम्ही ही कमी नाहीत

यावर्षी सचिन कमाले या थॅलेसिमिया ग्रस्त रुग्णाने डीटीएल परीक्षा उत्तीर्ण केली. तर नेहा गायकवाड हीने बीएस्सी नर्सीगला प्रवेश मिळविला. ऋषीकेश पुरी या हिमोफिलयाग्रस्त विध्यार्थाला यवतमाळ येथे एमबीबीएसला प्रवेश मिळाला. यावरूनच दर पंधरा दिवसाला मृत्युशी झुंज देणाऱ्या या रुग्णांनी आम्ही ही कमी नाहीत हे  सिध्द केले आहे.

ज्या कुटुंबात एक बालक थॅलेसिमिया मेजर आहे. अश्या कुटुंबातील सहा गरोदरमातांची तापसणी औरंगाबाद येथे करण्यात आली. त्यामुळे तीन थॅलेसिमिया मुक्त बालकांचे जन्म झाले. तर तीन बालक तपासणीत मेजर आढळुन आली त्यांचा जन्म आम्ही रोखू शकलो. 2021 मध्ये जिल्ह्यातील प्रत्येक गाव थॅलेसिमिया मुक्त करण्याचा आम्ही संकल्प केला आहे.
- लक्ष्मीकांत पिंपळगावकर, थॅलेसिमिया सपोर्ट ग्रुप, परभणी

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: Thalassemia support group saves lives in corona crisis, commendable performance of Thalassemia Support Group nanded news