esakal | परभणीत उडाला भडका, कशाचा ते वाचाच...
sakal

बोलून बातमी शोधा

gardi

परभणी शहरात तीन दिवसांच्या बंदनंतर शुक्रवारी शिथिलता मिळताच बाजारात खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर शुक्रावारी वाहतुकीची कोंडी झाली होती. यामुळे बाजारपेठेसह सर्वच ठिकाणी पाय ठेवायलाही जागा मिळेनासी झाली. 

परभणीत उडाला भडका, कशाचा ते वाचाच...

sakal_logo
By
कैलास चव्हाण

परभणी ः दिवसागणिक वाढत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि प्रशासनासह नागरिकांची वाढलेली चिंता यामुळे जिल्हावासियांच्या सुरक्षेसाठी तीन दिवसांची कडक संचारबंदी लागू केली होती. तीन दिवस नागरिक घरात तर बसले, पण शुक्रवारी शेवटी नागरिकांनी बाजारात गर्दीचा भडका उडवला आणि एकच झुंबड उडाली. 
 
तीन दिवसांच्या संचारबंदीमध्ये शिथिलता मिळताच शुक्रवारी (ता. २९) बाजारपेठत झुंबड उडाली. महामार्गासह सर्वच रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र होते. भाजीपाला, किराणा साहित्यासह मोंढ्यातील कृषी केंद्रांवर तुफान गर्दी झाली होती. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने (ता. २६ ते २८) मेपर्यंत संचारबंदी लागू करत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य अस्थापना बंद ठेवण्यात आल्या होत्या. शुक्रवारी संचारबंदी कायम ठेवली असली तरी काही दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. तसेच यापूर्वीच्या आस्थापनांसोबत अन्य काही आस्थापनांना सूट दिली आहे.

हेही वाचा - Video -  मधुमेहींनी कोरोनापासून अशी घ्यावी काळजी - डॉ. संतोष मालपाणी

या आस्थापनांना मिळाली मुभा 
बांधकाम, इलेक्ट्रिकल, कृषी संबंधित सर्व दुकाने, अवजारे दुरुस्ती, विक्री आदी दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा मिळाली आहे. त्यामुळे शुक्रवारी बाजारपेठेत मोठी झुंबड उडाली. भाजीपाला, किराणा साहित्यासह मोंढ्यातील कृषी केंद्रांवर तुफान गर्दी झाली होती. पोलिसांसह महापालिका प्रशासनाने गर्दी सावरण्यासाठी उपाययोजना केल्या. 

हेही वाचा - उमेदमुळे तीच्या कर्तृत्वाला मिळाली लॉकडाऊनमध्ये भरारी

वाहनांची वर्दळ वाढली
शहरात येणाऱ्या वाहनांची संख्यादेखील वाढल्याने वसमत, जिंतूर, गंगाखेड रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली. शहरातील मुख्य बाजारपेठेत भाजीपाला विक्रेत्यांचे गाडे लागल्याने नागरिकांची एकच गर्दी झाली. किराणा, इलेक्ट्रिकल दुकानांवरदेखील गर्दी झाल्याचे चित्र होते. जुना मोंढा, कच्छी बाजार, गुजरी बाजार, गांधी पार्क, कडबी मंडी, स्टेशन रस्ता आदी भागांत गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. 

बॅंकेसह बाजार समितीत रांगा 
तीन दिवसांनंतर बॅंका सुरू झाल्याने बॅंकांसमोरदेखील मोठ्या रांगा लागल्या होत्या. तसेच शासकीय कार्यालयांतदेखील वर्दळ वाढली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातदेखील शेतीसाहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. खरीप हंगाम जवळ येत असल्याने खते, बियाणे खरेदीसाठी शेतकरी मोंढ्यात येत आहेत. मात्र, तीन दिवसांच्या सुटीमुळे शुक्रवारी एकदमच गर्दी झाली.