esakal | परभणी : ढेंगळी पिंपळगाव येथे संत्रा विक्री पद्धतीचा एक अनोखा उपक्रम.
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

ढेंगळी पिंपळगाव (ता. सेलू ) येथील गोविंद (भाऊ) जोशी यांच्या शेतावर साडेतीन एकर क्षेत्रावर लागवड केलेली ५२५ झाडांची संत्रा बाग आहे.

परभणी : ढेंगळी पिंपळगाव येथे संत्रा विक्री पद्धतीचा एक अनोखा उपक्रम.

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) - संत्रा बागेच्या झाडावरील फळांचा लिलाव पद्धतीने शेतावरच विक्री करण्याचा एक नवा उपक्रम येथिल शेतकरी संघटनेचे गोविंद ( भाऊ ) जोशी यांनी गुरूवारी ( ता.०३ ) रोजी ढेंगळी पिंपळगाव ( ता.सेलू ) येथिल त्यांच्या शेतात केला आहे.

ढेंगळी पिंपळगाव (ता. सेलू ) येथील गोविंद (भाऊ) जोशी यांच्या शेतावर साडेतीन एकर क्षेत्रावर लागवड केलेली ५२५ झाडांची संत्रा बाग आहे. बागेतील झाडांवर मृग बहराची फळे लागलेली आहेत. ही फळे  साधारण मार्च महिण्यात परिपक्व होतात. उभ्या झाडांवरील फळांचे गुत्ता पद्धतीने किंवा वजनावर विक्री व्यवहारचे सौदे करण्याची पद्धत सर्वत्र प्रचलित आहे. जून व जुलै पासून ते फेब्रुवारी मार्च पर्यंत असे सौदे देण्याची प्रक्रिया चालू असते. हा सौदा व्यवहार शेतकरी आणि खरेदीदार व्यापारी या दोघांमध्ये होत असतो. फेब्रुवारी व मार्च मधील संभाव्य बाजार किंमतीचा अंदाज लावणे शेतकऱ्यांसाठी कठीण असल्यामुळे हे सौदे योग्य किंमतीत होण्याची शक्यता खूप कमी असते. यावर्षी संत्र्याच्या मृग बहराची फूट महाराष्ट्रात किंवा विदर्भात खूप कमी असल्यामुळे सर्वत्र तेजीची धारणा आहे.

हेही वाचा -  भोकरचे नागनाथ घिसेवाड यांचा भाजपला जय श्रीराम, काॅंग्रेस पक्षात प्रवेश -

या पार्श्वभूमीवर गोविंद (भाऊ) जोशी यांनी ४० ते ५० व्यापाऱ्यांना ढेंगळी पिंपळगाव ( ता.सेलू ) येथे निमंत्रण देऊन लिलाव पद्धतीने संत्रा बागेच्या झाडावरील फळांचा गुत्ता पद्धतीने विक्री सौदा दिला. लिलावा मध्ये वीस व्यापाऱ्यांनी भाग घेतला होता. मेहकर ( जि. बुलढाणा) येथील बागवान हाजी सय्यद रफिकभाई यांनी सर्वात जास्त बोली लावून वीस लाख,एकेवीस हजार रुपयांत हा सौदा विकत घेतला.याप्रसंगी परिसरातील फळ बागायतदार शेतकरी, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, सेलू येथील मोंढ्यातील व्यापारी उपस्थित होते. शेतकरी संघटनेच्या स्पर्धा आणि खुल्या बाजाराच्या तत्त्वाशी सुसंगत असा हा व्यवहार झाल्याची  चर्चा शेतकर्‍यांमधून होत आहे.

फळबागायत करणार्‍या शेतकर्‍यांसाठी या पध्दतीने विक्रि करण्याचा चांगला पायंडा निर्माण होत आहे.त्यामुळे व्यापार्‍यांची मत्तेदारी दूर होणार आहे.या उपक्रमामूळे फळबागायतदार शेतकर्‍यांचे गट निर्माण होण्यास प्रेरणा मिळणार आहे.

- उध्दव सोळंके, शेतकरी, ढेंगळी पिंपळगाव

संपादन - प्रल्हाद कांबळे