Parbhani : जलदगती न्यायालयात पीडितेला न्याय मिळेल;रूपाली चाकणकर

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना जगण्याचा अधिकार नाही
रूपाली चाकणकर
रूपाली चाकणकरsakal

सेलू : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना जगण्याचा अधिकार नाही, त्यांना फाशीच झाली पाहिजे, अशी महिला आयोगाची भूमिका आहे. सेलू येथील अत्याचार प्रकरण जलदगती न्यायालयात चालविले जाईल. न्यायालयात पीडितेला न्याय मिळेल, अशी ग्वाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिली.

सेलू तालुक्यात ता. ५ सप्टेंबरला दोघांनी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. श्रीमती चाकणकर यांनी शुक्रवारी पीडितेची भेट घेतली. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना, सेलू पोलिस ठाण्याचे निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, भावना नखाते, प्रेक्षा भांबळे, निर्मला लिपने, विनायक पावडे, कपिल आकात, अजय डासाळकर आदींची उपस्थिती होती. श्रीमती चाकरणकर म्हणाल्या, ‘‘अशा प्रवृत्तीच्या नराधमांना मोकळे सोडणे समाजासाठी त्रासदायक ठरेल.

या आरोपींना फाशीची शिक्षा मिळेपर्यंत पाठपुरावा करून पीडितेला न्याय मिळवून देण्यास महिला आयोग सर्वस्तरीय प्रयत्न करणार आहे. आयोगाच्या माध्यमातून पीडितेला शासनाच्या नियमाप्रमाणे मदतही मिळवून दिली जाईल’’, अशी ग्वाही दिली. ‘‘मी जेव्हा पीडितेला भेटायला तिच्या घरी गेले तेव्हा त्या पीडितेच्या अंगावर शहारे आले. इतक्या कोवाळ्या वयात अत्याचार होणे समाजासाठी घातकच आहे’’, असेही त्या म्हणाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com