
Parbhani Violence: राज्यघटनेच्या उद्देशिकेच्या प्रतिकृतीची तोडफोड केल्याप्रकरणी परभणीत उसळलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सुर्यवंशी या कायद्याच्या विद्यार्थ्याचा तरुणाचा न्यायालयीन कोठडीत अर्थात तुरुंगात मृत्यू झाला होता. या मृत्यूप्रकरणी सरकारनं त्याच्या कुटुंबियांना १० लाखांची नुकसान भरपाई देऊ केली आहे. या मदतीचा चेक घेऊन आज तलाठी त्याच्या घरी पोहोचले. पण दिवंगत सोमनाथच्या आईनं ही मदत नाकारली. आम्हाला केवळ न्याय पाहिजे, मदत नको असं त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं.