
नालासोपारा: इन्कम टॅक्स विभागात 'सहाय्यक आयुक्त', 'आयकर निरीक्षक' या पदावर नोकरी लावून देतो असं आमिष दाखवून एका वाहनचालकानं आपण आयकर आयुक्त असल्याचं सांगत ४० सुशिक्षित बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. विरार पोलिसांच्या क्राईम ब्रान्च कक्ष तीनच्या पथकानं याचा भांडाफोड केला आहे. धक्कादायक म्हणजे या तोतया आयुक्ताकडं विविध पदाची २८ बोगस आयकार्ड आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे.