Parbhani Violence Marathi News : परभणीत संविधानाच्या प्रतिमेच्या शिल्पावर झालेल्या दगडफेकीमुळं तणाव निर्माण होऊन त्याला आज हिंसक वळण लागलं. संतप्त जमाव आक्रमक झाल्यानं ठिकठिकाणी हिंसक घटना घडल्या. या घटनांवर खासदार संजय जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांवर ठपका ठेवत मुख्यमंत्र्यांशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही असं त्यांनी म्हटलं आहे.